शिंदे-राणेंमध्ये दोस्ताना? : गणपतीला गेले, दसरा मेळाव्यालाही आमंत्रण देण्याची शक्यता
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त आज पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या घरी भेटीगाठीचा कार्यक्रम आखला होता. यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजप नेते मोहित कंबोज आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरी जावून शिंदे यांनी गणपतीचे दर्शन घेतले. याशिवाय शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याही घरी एकनाथ शिंदे गेले होते. राणेंच्या घरी शिंदेंनी […]
ADVERTISEMENT

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त आज पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या घरी भेटीगाठीचा कार्यक्रम आखला होता. यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजप नेते मोहित कंबोज आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरी जावून शिंदे यांनी गणपतीचे दर्शन घेतले. याशिवाय शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याही घरी एकनाथ शिंदे गेले होते.
राणेंच्या घरी शिंदेंनी दिलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गणेशोत्सवासोबतच शिंदे गटाकडून राणे यांना दसरा मेळाव्यालाही निमंत्रण मिळण्याचे संकेत दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर यांनी दिले आहेत. यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वैर सर्वश्रृत असताना राणे आणि शिंदे यांच्यामध्ये मैत्रीसंबंध वाढत आहेत का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
CM शिंदेंच्या दसरा मेळाव्याला व्यासपीठावर राज ठाकरे दिसणार? सदा सरवणकरांचे संकेत
नारायण राणे यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण?
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे जर दसरा मेळाव्याला व्यासपीठावर दिसले तर त्यात आश्चर्य वाटायला नको, असे म्हणतं राज ठाकरे यांना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना दिले आहेत.
सरवणकर म्हणाले, जे कोणी हिंदुत्वासाठी एकत्रित आणण्याचे काम शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या पक्षांचे आणि हिंदुत्ववादी विचारांचे नेते शिवसेनेच्या व्यासपीठावर आलेले आहेत. त्यामुळे हे नेते उद्या व्यासपीठावर दिसले तर त्याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
कल्याण : ‘मी शिवसेना बोलतेय’ देखाव्याला कोर्टाची परवानगी; गणेश मंडळाच्या लढ्याला यश
राणे यांच्याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या दसरा मेळाव्याला बोलावले जाणार असल्याचे संकेत आमदार सदा सरवणकर यांनी दिले आहेत. यातून शिंदे यांनी उद्धव ठाकरे दुरावल्यानंतर दुसऱ्या ठाकरेंना जवळ करण्याची रणनीती आखली आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.