रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारं Budget सादर-मुख्यमंत्री
कोरोनामुळे देशात, राज्यात संपूर्ण जगात आव्हानात्मक परिस्थिती होती. मात्र कोणतंही रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आज आमच्या सरकारने मांडला आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज अजित पवार यांनी सादर केला. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा […]
ADVERTISEMENT

कोरोनामुळे देशात, राज्यात संपूर्ण जगात आव्हानात्मक परिस्थिती होती. मात्र कोणतंही रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आज आमच्या सरकारने मांडला आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज अजित पवार यांनी सादर केला. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा फटका बसला. अशा स्थितीत जनतेला काय दिलासा मिळणार आहे याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. अशातही सरकारकडून विविध योजनांची घोषणा करण्यात आली. तसंच अनेक विभागांसाठी कोट्यवधींचा निधीची घोषणाही करण्यात आली आहे.
आपल्याला अपेक्षित येणं किती होतं? आणि आलं किती? याची आकडेवारी सगळ्यांनाच माहित आहे. अशा स्थितीतही सर्व घटकांना दिलासा देत राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केल्याचा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने धन्यवाद देतो याचं कारण म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्राचं हे ६१ वं वर्ष आहे. दरवर्षी राज्यात आणि केंद्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतलं जातं. दरवर्षी हे अधिवेशन घेऊन विकासाला दिशा दिली जाते. हे वर्ष अत्यंत आव्हानात्मक होतं. आर्थिक उलाढाल राज्यात, देशात मंदावली. केंद्र सरकारकडून किती येणं बाकी आहे.. किती पैसे मिळाले हे सगळ्यांना माहित आहेच. तरीही महाराष्ट्र कधीही थांबला नाही महाराष्ट्र कधीही थांबणार नाही याचं प्रतिबिंब हे आजच्या बजेटमध्ये दिसलं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. प्रत्येकजण आपल्या नजरेने आपल्या चष्म्यातून या अर्थसंकल्पाकडे पाहू शकतो. मात्र जनतेचा जो आम्हाला आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे त्याच अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.