शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक, केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात व्यूहरचना?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यात बैठक झाली आहे. सुमारे अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. मुंबई, पुणे आणि महराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांच्या महापालिका निवडणुका आगामी काळात आहेत. सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधले नेते आणि मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा हात धुऊन लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं आहे.

महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी अशा नेत्यांच्या मागे सध्या सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीचे शुल्ककाष्ट लागलेले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, आता या यंत्रणांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी घेतला आहे. त्याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आता केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात रस्त्यावर उतरून विरोध करण्याचं आवाहन महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांना केलं आहे. भाजप दबावाचे राजकारण करत आहे. भाजपचे नेते रोज महाविकास आघाडीतील कोणत्या ना कोणत्या नेत्यावर आरोप करत आहेत. मी एकट्याने त्यांना उत्तर देण्यापेक्षा इतरांनीही बोललं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले होते.

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनीही आक्रमक भूमिका घेतलीय. शिवसेनेतून खासदार संजय राऊत हेच भाजपवर हल्ला चढवत असल्याचे चित्र अशताना आता सर्व मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचं भास्कर जाधव म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी लागल्या आहेत. तसंच यंत्रणेच्या माध्यमातून मराठी अधिकाऱ्यांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे. या तपास यंत्रणा भाजपासाठी काम करत आहेत, असा आरोपही जाधव यांनी केलाय.

ADVERTISEMENT

‘नवाब मलिक म्हणजे मुंबईचे कचरा किंग’ 100 कोटींचा अब्रू नुकसानाची दावा करणार-मोहित कंबोज

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातही ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख केला होता. महाराष्ट्र काही असा नाही की इथे गांजाची शेती होते वगैरे उल्लेख केले होते. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनीही केंद्राकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची बाब नमूद केली होती. आज या दोघांच्या भेटी दरम्यान या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT