बुलडाणा : जेवण न मिळाल्यामुळे रुग्ण कोविड सेंटरबाहेर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विदर्भात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता…जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. परंतू बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील विसावा भवन कोविड सेंटरमधील कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण जेवण मिळत नसल्यामुळे रस्त्यावर आले होते. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना कंत्राटदाराकडून योग्य वेळेत जेवण पुरवलं जात नसल्यामुळे नाराज झालेल्या रुग्णांनी रस्त्यावर येऊन निदर्शन केली. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण कोविड सेंटरबाहेर आल्यामुळे यंत्रणेमध्ये खळबळ उडाली होती.

दरम्यान रुग्ण बाहेर आल्याची माहिती समजताच…प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली. महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचत रुग्णांची समजून काढली आणि त्यांना परत कोविड सेंटरमध्ये पाठवलं. दरम्यान अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनीही या विषयाची दखल घेऊन चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात १५ हजारांहून जास्त Corona पॉझिटिव्ह रूग्ण

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT