कोरोनामुळे सोनिया गांधींची प्रकृती खालवली, दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल

मुंबई तक

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी कोव्हिडच्या वाढलेल्या त्रासामुळे नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 जून रोजी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. यानंतर त्यांनी स्वतःला आयसोलेट केलं होते. पण त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काँग्रेसचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी कोव्हिडच्या वाढलेल्या त्रासामुळे नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 जून रोजी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. यानंतर त्यांनी स्वतःला आयसोलेट केलं होते. पण त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्व हितचिंतकांचे त्यांच्या काळजी आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. त्याचवेळी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधींना चांगले आरोग्य आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही सोनिया गांधींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी यांच्या प्रकृतीबद्दल मी चिंतीत आहे, कोव्हिडशी संबंधित समस्यांमुळे त्यांना आज गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी त्यांना लवकरात लवकर बरे व्हावे आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.’

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 जून रोजी हजर राहण्यासाठी आधीच समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने 8 जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते, मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. आता त्या 23 जूनला ईडीसमोर हजर राहणार आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp