मुंबईतल्या खासगी रूग्णालयांमधील लसीकरण केंद्रांविषयी मोठा निर्णय

मुंबई तक

मुंबई महापालिका क्षेत्रातील कोव्हिड लसीकरण केंद्रं आता २४ तास सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण विषयक अमलबजावणी सुयोग्य पद्धतीने करण्यात येते आहे. लसीकरण वाढवण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चह यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही या बैठकीत मार्गदर्शन केलं. महानगरपालिकेच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई महापालिका क्षेत्रातील कोव्हिड लसीकरण केंद्रं आता २४ तास सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण विषयक अमलबजावणी सुयोग्य पद्धतीने करण्यात येते आहे. लसीकरण वाढवण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चह यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही या बैठकीत मार्गदर्शन केलं. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, मनपा रूग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी यांची उपस्थिती होती. या बैठकीत मुंबईतल्या खासगी रूग्णालयांमधील कोव्हिड लसीकरण केंद्रं २४ तास सुरू ठेवण्यास मुभा देण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे.

महागुरू सचिन पिळगावकर यांनी घेतली कोरोना लस

बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे

९ मार्चपर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचंही लसीकरण सुरू. ९ मार्चपर्यंत १५ हजार २७२ व्यक्तींचं लसीकरण.

हे वाचलं का?

    follow whatsapp