जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांना दुसऱ्या पत्नीकडून होत होती मारहाण, नर्सने केला धक्कादायक खुलासा

जाणून घ्या काय म्हटलं आहे या नर्सने आणि केंब्रिज पोलिसांच्या तपास पथकाने?
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांना दुसऱ्या पत्नीकडून होत होती मारहाण, नर्सने केला धक्कादायक खुलासा

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी एक ओळ लिहिली होती ज्यात ते म्हणाले होते की ब्रह्मांडात डोकावता येणं शक्य आहे पण कोणत्याही स्त्रीच्या मनात डोकावणं कठीण. त्यांना नेमकं काय छळत होतं? नेमक्या कोणत्या उद्विग्नतेतून त्यांनी ही ओळ लिहिली होती. व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडात काय चाललं आहे ते पाहू शकणारे स्टिफन एका महिलेच्या अत्याचाऱ्यापुढे हतबल झाले होते.

हा किस्सा रंजक आहे पण त्याहीपेक्षा इतक्या मोठ्या शास्त्रज्ञाच्या बाबतीतही असं घडू शकतं हा प्रश्न पाडणारा आहे. जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ असा लौकिक असलेल्या स्टिफन हॉकिंग यांना त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडून शारिरीक आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता ही बाब खूप कमी लोकांना ठाऊक आहे. दुसऱ्या पत्नीकडून अन्याय होऊनही स्टिफन हॉकिंग यांनी कधीही तिच्याबद्दल तक्रार केली नाही. तिला कोणतीही शिक्षाही दिली नाही. 2006 मध्ये या दोघांनीही सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

1990 च्या दशकात स्टिफन हॉकिंग आणि जेन हॉकिंग यांचा पहिला घटस्फोट झाला. त्याचीही चर्चा झाली होती. जेन यांना संशय घेण्याची सवय होती. त्यामुळे स्टिफन आणि जेन यांनी 90 च्या दशकात वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जेन तिच्या तीन मुलांना घेऊन स्टिफन यांना सोडून निघून गेली. या घटनेच्या पाच वर्षांनंतर स्टिफन हॉकिंग यांनी दुसरं लग्न केलं. त्यांनी हे लग्न त्यांची देखभाल करणारी नर्स एलेन मेसॉनसोबत केलं. एलेनचंही हे दुसरं लग्न होतं. तिचा पहिला नवरा डेव्हिड मेसॉन हा इंजिनिअर होता. तो स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर मध्ये असलेल्या स्पीच सिंथसायजर या मशीनच्या देखभालीचंही काम करत होता. या स्पिच सिंथसायजरमुळेच स्टिफन हे जगाशी संवाद साधू शकत होते.

केम्ब्रिज पोलिसांच्या तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार 2003 नंतर स्टिफन हॉकिंग यांना मारहाण करण्यात येत होती. त्यांच्या शरीरावर मारहाण झाल्याचे आणि त्यांना छळण्यात आल्याचं दिसून येत होतं. तपासकर्त्यांना ही बाब एका दुसऱ्या नर्सने सांगितली होती. स्टिफन हे त्यांची दुसरी पत्नी एलेन सोबत असायचे त्यानंतर या मारहाणीच्या आणि अत्याचाराच्या खुणा दिसत असत असंही या नर्सने सांगितलं होतं.

स्टिफन हॉकिंग यांची दुसरी पत्नी एलेन ही कायमच त्यांना अपंग म्हणून हिणवत होती. तसंच त्यांना गरजेपेक्षा जास्त उकळलेल्या पाण्याने अंघोळ घालत असे. एवढंच नाही तर त्यांना झोपायचं असेल तरीही एलेन त्यांना गादीवर रागाने टाकायची. तपासकर्त्यांनी घरातले नोकर आणि नर्स यांची चौकशी केली तेव्हा हे सत्य समोर आलं की स्टिफन हॉकिंग यांची दुसरी पत्नी एलेन त्यांना मारहाण करत होती आणि त्यांचा मानसिक छळही करत होती.

आपल्या अहवालात तपासकर्त्यांनी हेदेखील म्हटलं आहे की एलेन मेसॉनविरोधात आम्हाला कुठलाही सबळ पुरावा मिळाला नाही. तसंच स्टिफन हॉकिंग यांनीही कधी तिच्याविषयी तक्रार केली नाही. त्यामुळे एलेनच्या विरोधात आम्ही कोणताही गुन्हा दाखल करू शकलो नाही. मात्र हे खरं आहे की एलेन त्यांना मारहाण करत होती. आम्हाला स्टिफन यांच्या घरातल्या नोकरांनी ही बाब सांगितली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

स्टिफन हॉकिंग यांच्या आयुष्यावर THE THEORY OF EVERYTHING हा सिनेमाही आला होता. या सिनेमात त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यातल्याही काही गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. स्टिफन हॉकिंग यांनी एका मुलाखतीत स्त्रियांबाबत आपलं मत मांडलं होतं. महिला या आणि त्यांचं मन ओळखणं हे गूढ असतं असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या मनाची खोली किती आहे? त्या मनात काय काय दडवून आहेत हे कुणालाही सांगता येणार नाही असंही स्टिफन यांनी म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in