परभणीत सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी लागू

मुंबई तक

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात खबरदारीचा उपाय म्हणून परभणीत शुक्रवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी महानगरपालिका व सर्व नगरपालिका हद्दीत या संचारबंदीची घोषणा केली आहे. परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना परभणीच संचारबंदीची लागू करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी संचारबंदीच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात खबरदारीचा उपाय म्हणून परभणीत शुक्रवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी महानगरपालिका व सर्व नगरपालिका हद्दीत या संचारबंदीची घोषणा केली आहे. परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना परभणीच संचारबंदीची लागू करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते.

जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी संचारबंदीच्या काळात शहरातील लोकांसाठी नवे नियम जाहीर केले आहेत. संचारबंदीच्या काळात लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून औषधं, किराणामाल, दूध अशा जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळला सर्व दुकानं बंद असणार आहे. याव्यतिरीक्त शहरातले संपूर्ण आणि बाजारपेठा या काळात बंद असणार आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp