Swati Maliwal: ‘वडिलांनीच माझं लैंगिक शोषण केलं, ते घरी आले की…’
Swati Maliwal Sexually Assaulted : जेव्हा मी लहान होते त्यावेळेस माझ्या वडिलांनीच माझे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक खुलासा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी केला आहे. या शोषणानंतर मी रोज रात्री विचार करायचे, महिलांना कशाप्रकारे हक्क मिळवून दिला पाहिजे. मुलींचे आणि महिलांचे शोषण करणाऱ्यांना कसा धडा शिकवला पाहिजे, असे स्वाती मालीवाल यांनी […]
ADVERTISEMENT

Swati Maliwal Sexually Assaulted : जेव्हा मी लहान होते त्यावेळेस माझ्या वडिलांनीच माझे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक खुलासा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी केला आहे. या शोषणानंतर मी रोज रात्री विचार करायचे, महिलांना कशाप्रकारे हक्क मिळवून दिला पाहिजे. मुलींचे आणि महिलांचे शोषण करणाऱ्यांना कसा धडा शिकवला पाहिजे, असे स्वाती मालीवाल यांनी सांगितले आहे. त्यांच्या या विधानानंतर एकच खळबळ माजली आहे. (dcw chief swati maliwal expresses her father sexually assaulted during childhood)
मला अजूनही आठवणीत आहे. जेव्हा ते मला मारायला यायचे, त्यावेळी ते माझी शेंडी पकडायेच आणि माझं डोक भिंतीवर आपटायचे.ज्यामुळे मला गंभीर इजा व्हायची आणि माझ्या डोक्यातून रक्त वाहायचे, असा देखील वाईट अनुभवाचा किस्सा मालिवाल यांनी सांगितला आहे. जेव्हा एखादा व्यक्ती खुप अत्याचार सहन करतो,त्यावेळेसच तो दुसऱ्याचे दु:ख समजू शकतो. तेव्हा त्याच्या आतमध्ये असा ज्वालामुखी पेटतो, ज्यामुळे तो संपुर्ण यंत्रणा हादरवून टाकू शकतो. माझ्यासोबत देखील तेच घडले आहे, असे मालीवाल (Swati Maliwal) सांगतात.
प्रियकराकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या, लव्ह जिहादचा आरोप… प्रकरण काय?
जेव्हा मी लहान होते, त्यावेळेस माझे वडिल लैंगिक शोषण करायचे. ते मला खुप मारायचे. ज्यामुळे घाबरून मी बिछाण्याच्या खाली लपायचे आणि रोज रात्री विचार करायचे, महिलांना कशाप्रकारे हक्क मिळवून दिला पाहिजे. मुलींचे आणि महिलांचे शोषण करणाऱ्यांना कसा धडा शिकवला पाहिजे, असे स्वाती मालीवाल म्हणाल्या आहेत. ही घटना तेव्हाची आहे, जेव्हा त्या चौथीत शिकत होत्या. तेव्हा त्या वडिलांसोबत राहायच्या आणि अनेकदा ही घटना घडली होती.