निकाल लागताच अशोक चव्हाणांना सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंचा फोन
रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी मोठी विजय संपादित केला. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी काँग्रेस आणि भाजप आमने-सामने होते. मात्र, महाविकास आघाडीच्या एकीने काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. या विजयानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे […]
ADVERTISEMENT

रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी मोठी विजय संपादित केला. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी काँग्रेस आणि भाजप आमने-सामने होते. मात्र, महाविकास आघाडीच्या एकीने काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. या विजयानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांचं फोन करून अभिनंदन केलं.
रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झाल्याने देगलूर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र, निवडणुकीच्या आधीच शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबने यांनी अशोक चव्हाणांवर आरोप करत शिवसेना सोडली. साबने यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे पंढरपूरमध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी भाजपच्या बाजूने निकाल लागू शकतो, असं बोललं जात होतं. मात्र, महाविकास आघाडीला या निवडणुकीत यश मिळालं.
या निकालानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देगलूरच्या विजयाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दूरध्वनी करून विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अशोक चव्हाण यांना दूरध्वनी करून देगलूरच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी ३.३० वाजता पोटनिवडणुकीच्या मतमोजणीचा कल स्पष्ट होताच दूरध्वनी करून अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केलं.
महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा विजय