Delhi NCR Earthquake: इमारती थरथरल्या… दिल्लीकरांच्या काळजाचा चुकला ठोका
दिल्ली-एनसीआरमध्ये 21 मार्च रोजी भूकंपाचे हादरे जाणवले. यामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. भूकंपाच्या हादऱ्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.6 इतकी होती. यावेळी दिल्लीच नाही तर, भारतासह उत्तरेकडील देशांनाही भूकंपाच्या हादऱ्याचा फटका बसला. लोक घाबरून घराबाहेर पडले. भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तान हे भूकंपाचे लक्ष्य असणारे देश होते. भूकंपविज्ञान विभागाने दिलेल्या […]
ADVERTISEMENT

दिल्ली-एनसीआरमध्ये 21 मार्च रोजी भूकंपाचे हादरे जाणवले. यामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.
भूकंपाच्या हादऱ्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.6 इतकी होती.
यावेळी दिल्लीच नाही तर, भारतासह उत्तरेकडील देशांनाही भूकंपाच्या हादऱ्याचा फटका बसला. लोक घाबरून घराबाहेर पडले.
भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तान हे भूकंपाचे लक्ष्य असणारे देश होते.
भूकंपविज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातील कलाफगनपासून 90 किमी अंतरावर रात्री 10:17 वाजता भूकंपाचे हादरे जाणवले.
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक दिवसापूर्वी भूकंपाचे हादरे जाणवले होते.
तर रात्री 10.15 च्या सुमारास दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
दिल्लीत महिनाभरात भूकंपाचे हादरे तिसऱ्यांदा जाणवले आहेत.