NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे-फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांचा नवाब मलिक यांना टोला, त्यांच्या जखमेवरची खपली काढणार नसल्याचंही वक्तव्य
NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे-फडणवीस

NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं हे सगळ्यांना माहित आहे. मी त्यावर काही वेगळी प्रतिक्रिया देऊन नवाब मलिक यांच्या जखमेवरची खपली काढणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर खोचक टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन NCB वर निशाणा साधला, तसंच भाजपवरही आरोप केले. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी नवाब मलिक यांना टोला लगावला आहे.

NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे-फडणवीस
Drugs Case : नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजपच्या मनिष भानुशालींनी दिलं उत्तर, म्हणाले..

नवाब मलिक यांनी NCB आणि भाजपवर नेमके काय आरोप केले आहेत?

'राजीव गांधी यांच्या इच्छाशक्तीमुळे NDPS कायदा देशात लागू झाला. देश ड्रग्समुक्त व्हावा यासाठी NCB ची स्थापना करण्यात आली. यावेळी राज्यांसह केंद्रीय एजन्सीला देखील तपासाचे अधिकार देण्यात आले. गेल्या 36 वर्षापासून आतापर्यंत या तपास संस्थेने अनेक रॅकेट उघडकीस आणले आहेत. गेल्या 36 वर्षापर्यंत या एजन्सीच्या तपासावर कधीही शंका घेण्यात आली नाही. पण आता मात्र, NCB च्या तपास यंत्रणेवर सवाल उपस्थित केले जात आहेत.'

'सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण हे हत्या प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी असं चित्र निर्माण करण्यात आलं की, ड्रग्ससाठी त्याची हत्या झाली. तेव्हापासून NCB चं झोनल ऑफिस लाइमलाइटमध्ये आलं. त्यानंतर त्या प्रकरणात बातम्या प्लांट करण्यात आल्या आणि बॉलिवूडचं नाव खराब करण्यात आलं. अनेक कलाकारांना समन्स देऊन चौकशीसाठी बोलावण्यात आलं.' असं नवाब मलिक म्हणाले.

'तो' तर भाजपचा उपाध्यक्ष मनिष भानुशाली आहे'

'मनिष भानुशाली याचे फोटो मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीसांसोबत आहे, गुजरातच्या अनेक मंत्र्यांसोबत आहेत, केंद्रीय मंत्र्यांसोबत आहेत. त्यामुळे आता NCB ला सांगावं लागेल की, मनिष भानुशाली याचे NCB शी काय संबंध आहेत.' असा सवाल नवा मलिक यांनी केला आहे.

'हे संपूर्ण प्रकरणच बनावट आहे'

'जेव्हा हे सगळं शनिवार आणि रविवारी सुरु होतं तेव्हा एनसीबीने काही फोटो चॅनलच्या प्रतिनिधींना पाठवले. ज्यामध्ये चरस, कोकेन आहे असं सांगण्यात आलं. या गोष्टी आम्ही क्रूझवर जप्त केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पण NDPS कायद्यात जप्तीची एक प्रक्रिया आहे. हे जे फोटो आहेत ते कोणत्याही क्रूझवरील नाहीत. हे फोटो झोनल डायरेक्टरच्या ऑफिसमधील आहे. त्याचा एक व्हीडिओ मी तुम्हाला दाखवतो.'

'जेव्हा ड्रग्स प्रकरणात छापेमारी होते तेव्हा जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामा केला जातो. हा सगळा जप्तीचा माल कोणासमोरही उघडता येत नाही. फक्त कोर्टात मॅजिस्ट्रेटच्या समोर ते उघडलं जातं आणि तात्काळ सील केलं जातं. त्यामुळे हे व्हिडीओ, फोटो यातून हेच दिसतं की, या वस्तू क्रूझवर सापडलेल्या नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणच बनावट आहे.' असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे-फडणवीस
Drug Case: 'संपूर्ण ड्रग्स प्रकरणच बनावट', अनेक Video-फोटो दाखवत राष्ट्रवादीचे खळबजनक आरोप

काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे. ही अटक NCB ने केली आहे त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना टोला लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in