डोंबिवली : अमेरिकन डॉलर्सचं अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक
डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं होतं. चोरी, वाहनचोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी अशा अनेक गुन्ह्यांच्या नोंदी वाढल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं होतं. अखेरीस पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत वेगवेगळ्या गुन्ह्यांतील पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पहिल्या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी मोहीन अहमद आणि रफीक या दोन […]
ADVERTISEMENT

डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं होतं. चोरी, वाहनचोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी अशा अनेक गुन्ह्यांच्या नोंदी वाढल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं होतं. अखेरीस पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत वेगवेगळ्या गुन्ह्यांतील पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
पहिल्या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी मोहीन अहमद आणि रफीक या दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी नागरिकांना अमेरिकन डॉलर्सचं अमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करायचे. दोन्ही आरोपींविषयी अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने शोध घेत दोघांनाही अटक केली आहे.
बारामतीजवळ दारुने भरलेला ट्रक उलटला, दारुचे बॉक्स पळवण्यासाठी नागरिकांची गर्दी
याव्यतिरीक्त मानपाडा हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराना सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी रिक्षा, मोबाईल, बाईक, मंगळसूत्र, पैसे आणि अमेरिकन डॉलर हस्तगत केले असून हा एकूण ४ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आहे. शुभम बोराडे ,आकाश पोळे, आकाश शर्मा ,रफिक शेख ,मोहीन अहमद अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व चोरटे हे सराईत गुन्हेगार असल्याने पोलीस त्यांचा पुढील तपास करत आहेत. या सर्व आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आल्याची माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे यांनी दिली आहे.
बीड : परळी तालुक्यात गांजाची शेती करणाऱ्या तीन जणांना अटक