शंका आली म्हणून घरातील सोफा बघितला अन् शेजाऱ्यांना धक्काच बसला; डोंबिवलीतील घटना
डोंबिवलीमध्ये एक चक्रावून टाकणारी खूनाची घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचा घरातील सोफासेटमध्ये मृतदेह आढळून आला आहे. महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं असून, यासंदर्भात संशयितांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले होते. तर मुलगा […]
ADVERTISEMENT

डोंबिवलीमध्ये एक चक्रावून टाकणारी खूनाची घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचा घरातील सोफासेटमध्ये मृतदेह आढळून आला आहे. महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं असून, यासंदर्भात संशयितांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले होते. तर मुलगा दुपारी साडेबारा वाजता शाळेत गेला होता. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती.
संध्याकाळी किशोर हे कामावरुन घरी परतले. त्यावेळी पत्नी घरात नव्हती. त्यामुळे त्यांनी पत्नीचा शोध घेतला. घरात आणि आजूबाजूला सुप्रिया कुठेही आढळून आल्या नाहीत. नंतर नातेवाईकांसह मित्र मंडळी सगळीकडे त्यांच्याबद्दल विचारपूस केली. तरीही काहीच कळलं नाही.
सुप्रिया या नेमक्या कुठे गेल्या आहेत, हे समजलं नाही. शोधाशोध सुरू असताना याच दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक घरात आले. तर किशोर हे पत्नी हरवल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात पोहचले होते. रात्र झाली होती.
किशोर यांच्याकडे उठबस असणाऱ्या शेजाऱ्यांना घरातील सोफासेट दररोजपेक्षा अस्ताव्यवस्थ दिसून आला. शंका आली म्हणून त्यांनी तो सोफा तपासला. सोफा बघितल्यानंतर शेजाऱ्यांना धक्काच बसला. कारण सुप्रिया यांचा मृतदेह सोफ्यात कोंबून ठेवलेला होता.
सुप्रिया यांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि नंतर मृतदेह सोफासेटमध्ये लपवण्यात आला, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक अनिल पडवळ आणि पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुप्रिया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. सुप्रिया यांची हत्या कुणी व का केली? त्यांच्यावर काही चुकीचा प्रकार झाला आहे का? या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जात आहे.