डोंबिवली हादरली, 18 वर्षाच्या दोन तरुणांची लोकल ट्रेनसमोर येऊन आत्महत्या - Mumbai Tak - dombivli two 18 year old youth commits suicide in front of local train - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

डोंबिवली हादरली, 18 वर्षाच्या दोन तरुणांची लोकल ट्रेनसमोर येऊन आत्महत्या

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवलीत मागील दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे डोंबिवली हादरली असून सांस्कृतिक शहरात नेमकं चाललं तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. डोंबिवलीमधील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या रेल्वेकडून माहितीनुसार, निखिल श्रीकांत ओहल (वय 18 वर्ष) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव […]

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवलीत मागील दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे डोंबिवली हादरली असून सांस्कृतिक शहरात नेमकं चाललं तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

डोंबिवलीमधील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या रेल्वेकडून माहितीनुसार, निखिल श्रीकांत ओहल (वय 18 वर्ष) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या आयरेगावातील समतानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या निखिलने गुरुवारी दुपारी साडेबारा बाजण्याच्या सुमारास डोंबिवली ते कोपर रेल्वे स्टेशनसमोर धावत्या लोकल समोर येऊन आत्महत्या केली असल्याचं समजतं आहे.

मोटरमनने रेल्वे स्टेशन प्रबंधकांना सदर घटनेची माहिती दिली. स्टेशन प्रबंधकांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती वपोनी मुकेश ढगे यांनी दिली. मात्र निखिलने का आत्महत्या केली? हे अद्याप समजलेले नाही.

या घटनेपूर्वी बुधवारी कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान एका तरुणांचा मृत्यू झाला. डोंबिवली पूर्वकडील म्हात्रे नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने कोपर ते दिवा स्थानकादरम्यान ट्रॅकवर चालत जात समोर येणाऱ्या लोकलाखाली आपला जीव दिलीा. बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

करण अर्जुन शेट्टी (वय 18 वर्ष) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शेट्टी याचे वडिलांसोबत भाडणं झाले होते आणि याच रागातून त्याने आत्महत्या केल्याचे लोहमार्ग पोलिसांनी माहिती दिली.

डोंबिवली : ट्रेन पकडताना तोल गेला, ट्रॅक खाली जाणाऱ्या महिलेला दोन जवानांनी वाचवलं

डोंबिवलीतील कर्जबाजारी झालेल्या तरुण व्यावसायिकाची आत्महत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील कर्जबाजारी झालेल्या एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली होती. परंतू या लॉकडाउनचा फटका अनेक छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना बसला. डोंबिवलीत लॉकडाउनमुळे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे एका तरुण व्यावसायिकाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं.

सुरज सोनी असं या व्यावसायिकाचं नाव असून डोंबिवली पूर्व येथे दावडी भागातील साई गॅलक्सी या इमारतीत तो आपल्या कुटुंबासोबत रहायचा. डोंबिवली स्टेशन परिसरात मोबाईल रिपेअरिंग आणि पार्ट्सची खरेदी-विक्री सूरज करायचा. यातून मिळालेल्या पैशांवर सूरजच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. परंतू लॉकडाउन सुरु झाल्यापासून सूरजचा व्यवसाय ठप्प झाला होता ज्यामुळे त्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं.

घरात पत्नी आणि दोन मुलांची रोजची होणारी आबाळ, संपत चालेले पैसे या गोष्टींमुळे सूरज अस्वस्थ होता. लॉकडाउनच्या दीड ते दोन वर्षाच्या काळात सूरजने कसंबसं घर चालवलं. मध्यंतरी त्याने नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्यामध्येही अपयश आलं होतं. नंतर सूरजची परिस्थिती इतकी खालावली की लाईट बिल भरायला पैसे नसल्यामुळे त्याच्या घरातलं वीज कनेक्शन तोडण्यात आलं होतं.

थकलेलं घरभाडं, त्यात वीजबीलाचे पैसे नसल्यामुळे तोडलेलं कनेक्शन, बेरोजगारीची कुऱ्हाड यामुळे सूरज पूर्णपणे नैराश्यात गेला होता. त्यामुले सूरजने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + two =

‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी!