मुंबईत दीड कोटी रूपयांचे Drugs जप्त, NCB ची कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत दीड कोटींचे Drugs अर्थात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. NCB ने ही कारवाई केली आहे. अमेरिकेतून भारतात आणलेले हे ड्रग्ज NCB ने जप्त केले आहेत. ड्रग्जच्या पार्सलवर इमर्जन्सी फूड असा उल्लेख करण्यात आला होता अशीही माहिती समोर येते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून NCB मुंबईतील ड्रग्ज सप्लायर्स आणि पेडलर्स विरोधात कारवाई करताना दिसत आहे. NCB ने अनेक ठिकाणी कारवाई करून बऱ्याचदा ड्रग्ज जप्तही केले आहेत.

आज NCB ने मुंबईतून 2.2 किलोंचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या ड्रग्जची एकूण किंमत दीड कोटी रूपये आहे. मुंबईत NCB ने छापा टाकून ही कारवाई केली आहे. एका निळ्या रंगाच्या बॉक्सवर Mountain House 05 emergency food supply असं लिहिण्यात आलं होतं. सिल्व्हर रंगाच्या फूड पॅकेटमध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आले होते.

Drugs Case: सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला NCB कडून अटक, पाच दिवसांची कोठडी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

NCB ला परवाच हे ड्रग कॅलिफोर्नियावरून येणार असं समजलं होतं. हे ड्रग्ज इमर्जन्सी फूड असं म्हणून चार पॅकेट्समध्ये विभागण्यात आलं होतं. नगेट्सच्या स्वरूपात हे ड्रग्ज होते याची किंमत 1.5 कोटी होती. मेहरुअना असं या ड्रग्जला म्हणतात. हाय सोसायटीत हे ड्रग्ज जास्त ट्रेंड मध्ये आहे अशी माहिती समीर वानखडे यांनी दिली. वांद्रा, साऊथ मुंबई, नवी मुंबई, लोखंडवाला या ठिकाणी हे ड्रग्ज जाणार होतं. या ड्रग्जला नॉर्दन लाईट्स, मल्टि स्ट्रेन्स, नगेट्स अशी अनेक नावं आहेत अशीही माहिती समीर वानखेडे यांनी दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT