Nashik Crime : दारुड्या मुलाकडून आईची सिमेंटच्या खांबावर डोकं आपटून हत्या

मुंबई तक

दारु पिऊन उशीरा घरी परतलेल्या मुलाला घरात घेण्यास नकार दिल्यामुळे मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईने दार न उघडल्यामुळे संतापलेल्या मुलाने वाद घालत आईला धक्काबुक्की केली. ज्यात आईचं डोकं सिमेंटच्या खांबाला लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा जिव गेल्याचं कळतंय. पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोडवरील मेरी कॉलनी येथे विमल कचरु पवार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दारु पिऊन उशीरा घरी परतलेल्या मुलाला घरात घेण्यास नकार दिल्यामुळे मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईने दार न उघडल्यामुळे संतापलेल्या मुलाने वाद घालत आईला धक्काबुक्की केली. ज्यात आईचं डोकं सिमेंटच्या खांबाला लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा जिव गेल्याचं कळतंय.

पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोडवरील मेरी कॉलनी येथे विमल कचरु पवार आणि प्रशांत कचरु पवार हे दोघे मायलेक राहत होते. विमल पवार यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं, ज्यानंतर विमल पवार यांना पेन्शन मिळत होतं. प्रशांत पवारला दारुचं व्यवसन असून तो नेहमी दारु पिण्यासाठी पैसे दे यावरुन विमल यांच्याशी भांडण करायचा.

शुक्रवारी प्रशांत नेहमीप्रमाणे रात्री उशीरा दारुच्या नशेत घरी आला. यावेळी त्याने आईला घराचे दार उघडण्यासाठी बाहेरुन आवज दिला. यावेळी त्याच्या आईने आतूनच सांगितले की ‘खूप दारु पिऊन आला आहे, मी तुला घरात घेणार नाही’. यामुळे प्रशांतला आईचा राग अनावर झाला. काही वेळाने विमल पवार घराबाहेर येताच प्रशांतने त्यांच्याशी हुज्जत घातली.

नवजात बाळाला लोकल ट्रेनमध्ये सोडून देणाऱ्या महिलेसह प्रियकराला अटक

हे वाचलं का?

    follow whatsapp