देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात खटला दाखल करणारे वकील सतीश उकेंच्या घरी ईडीचा छापा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

महाराष्ट्र विधानसभेचे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. नागपूर येथील घरी ही कारवाई करण्यात आली. पहाटे पाच वाजता ही कारवाई झाली. अॅड. सतीश उके यांची राजकीय वर्तुळात बरीच उठबस असते. नाना पटोले यांचं वकीलपत्रही त्यांनी घेतलं होतं.

काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने अॅड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. अॅड. सतीश उके नागपुरातील प्रेस क्लब मध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आज ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने टाकला असू शकतो अशी चर्चा सुरू आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सतीश उके यांच्या घरी छापा मारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चौकशीसाठी ईडीचे अधिकारी त्यांना सोबत घेऊन गेले आहेत.

ADVERTISEMENT

न्या. लोया मृत्यू प्रकरणीही त्यांनी सनसनाटी आरोप करत अनेक महत्त्वाचे दावे केले होते. अॅड. सतीश उके यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात आरोपही केले होते. त्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर असलेला गुन्हा लपवला असल्याची तक्रार उके यांनी केली होती. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी उकेंनी केली. अॅड. सतीश उके हे जेएमएफसी कोर्टात गेले होते तेव्हा ही केस रद्द झाली होती. त्यानंतर उके यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. तेव्हा हे प्रकरण चालवण्याची परवानगी दिली. सत्र न्यायालयाच्याविरोधात फडणवीस उच्च न्यायालयात गेले होते. जिथे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय बाद ठरवण्यात आले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अॅड. सतीश उके यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही न्यायलयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT