पत्नींची अदलाबदली करुन उच्चभ्रू चालवत होते सेक्स रॅकेट, WhatsApp वर बनवलेला ग्रुप!
कोट्टायम (केरळ): केरळमध्ये पत्नींच्या अदलाबदलीचं एक मोठं सेक्स रॅकेट उघडकीस आलं आहे. यासाठी WhatsApp आणि Messenger वर ग्रुपही तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये सुमारे एक हजार लोकांना अॅड करण्यात आलं होतं. Husband Wife Exchange Racket मध्ये सामील असलेल्या एकूण 7 जणांना पोलिसांनी केरळच्या कोट्टायम (Kottayam) येथून अटक केली आहे. तसेच 25 हून अधिक लोकांवर पोलिसांचं […]
ADVERTISEMENT

कोट्टायम (केरळ): केरळमध्ये पत्नींच्या अदलाबदलीचं एक मोठं सेक्स रॅकेट उघडकीस आलं आहे. यासाठी WhatsApp आणि Messenger वर ग्रुपही तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये सुमारे एक हजार लोकांना अॅड करण्यात आलं होतं. Husband Wife Exchange Racket मध्ये सामील असलेल्या एकूण 7 जणांना पोलिसांनी केरळच्या कोट्टायम (Kottayam) येथून अटक केली आहे. तसेच 25 हून अधिक लोकांवर पोलिसांचं लक्ष आहे.
एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी पतीविरुद्ध देण्यात आलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, तो तिला इतर पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. यापूर्वी कायमकुलम येथूनही अशीच एक घटना समोर आली होती.
या प्रकरणी चांगनचेरीचे डेप्युटी एसपी आर श्रीकुमार म्हणाले- “आधी ते टेलीग्राम (Telegram) आणि मेसेंजर (Messenger) ग्रुपमध्ये सामील व्हायचे आणि नंतर एकमेकांना भेटायचे. आम्ही तक्रारदार महिलेच्या पतीला अटक केली आहे. यामागे एक मोठे रॅकेट आहे आणि आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध अद्यापही सुरू आहे.
अटक करण्यात आलेले लोक केरळमधील अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम (Alappuzha, Kottayam, Ernakulam) येथील रहिवासी आहेत. केरळमधील अनेक उच्चभ्रू वर्गातील लोक या रॅकेटचा भाग असल्याचीही पुष्टी पोलिसांनी केली आहे.