Pune : पिरंगुटमध्ये कंपनीला भीषण आग, 18 जणांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील मुळशीमधल्या उरवडे मधे पिरंगुट औद्योगिक परिसरातील अक्का टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या कंपनीत तेव्हा 37 कामगार होते. त्यातले 17 जण अडकले होते.आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. या घटनेत आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आगीचे नेमके कारण समजू […]
ADVERTISEMENT

पुणे जिल्ह्यातील मुळशीमधल्या उरवडे मधे पिरंगुट औद्योगिक परिसरातील अक्का टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या कंपनीत तेव्हा 37 कामगार होते. त्यातले 17 जण अडकले होते.आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. या घटनेत आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
आग लागल्याची माहिती समजताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्यासीठी प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पाच बंब दाखल झाले आहेत. याशिवाय रूग्णवाहिका देखील दाखल झालेली आहे.
चिंताजनक बाब म्हणजे या कंपनीत 17 कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या कंपनीत अन्य केमिकल्स देखील तयार केले जातात. याच केमिकल्समुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर देखील पसरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील मुळशीमधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या केमिकल कंपनीला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी कंपनीत 37 कामगार होते,या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर कामगारांचा शोध घेतला जात आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.