स्पा सेंटरला भीषण आग, एका महिलेसह दोन जणांचा होरपळून मृत्यू
नोएडा: राजधानी दिल्लीच्या नजीक असणाऱ्या नोएडामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नोएडातील सेक्टर-24 पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या स्पा सेंटरमध्ये आग लागल्याचे वृत्त नुकतंच हाती आलं आहे. ही आग एवढी भीषण होती की स्पा सेंटरमध्ये असलेल्या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि […]
ADVERTISEMENT

नोएडा: राजधानी दिल्लीच्या नजीक असणाऱ्या नोएडामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नोएडातील सेक्टर-24 पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या स्पा सेंटरमध्ये आग लागल्याचे वृत्त नुकतंच हाती आलं आहे. ही आग एवढी भीषण होती की स्पा सेंटरमध्ये असलेल्या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. मात्र, दुर्दैवाने या आगीच्या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
एक स्त्री आणि पुरुषाचा मृत्यू
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर-24 पोलिस स्टेशन हद्दीत एक स्पा सेंटर आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या स्पा सेंटरला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यापैकी एक महिला आणि एक पुरुष आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत.