चंद्रपूरमध्ये बिथरलेल्या हत्तीच्या हल्ल्यात वन विभागाच्या अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात धक्कादायक घटना घडली आहे. या जंगलात बिथरलेल्या ‘गजराज’ नावाच्या हत्तीने  वनविभागाच्या अधिकाऱ्याला चिरडलं आहे. या भागात वाहनातून कोळसा वनक्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक कुलकर्णी आणि ताडोबाचे मुख्य लेखापाल असे दोघे गस्तीवर होते. त्यावेळी बिथरलेल्या हत्ती गजराजने चाल करून येत दोघांवर थेट हल्ला केला. या हल्लाय हल्ल्यात प्रमोद गौरकार नामक मुख्य लेखापाल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ताडोबा कोअर क्षेत्रात बोटेझरी येथील हत्ती कॅम्पलगत झालेल्या या घटनेने वनविभाग हादरला आहे.

‘या’ गावात कोरोनापासून संरक्षणासाठी पाळीव प्राण्यांनीही लावला जातो आहे मास्क

आसपासच्या गावातील नागरिकांना बिथरलेल्या हत्तीबाबत सूचना देण्यात आली. त्यानंतर हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केल्यानंतर आज पहाटे पाचच्या दरम्यान हत्तीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. याआधी या गजराज हत्तीने आपल्याच माहुताला चिरडले होते. लेखापाल प्रमोद गौरकार यांच्या मृत्यूने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कर्मचारीवर्गावर शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकं काय घडलं?

बिथरलेल्या ‘गजराज’ नावाच्या हत्तीने वनविभागाच्या अधिकाऱ्याला चिरडले. बोटेझरी या भागात एका वाहनातून कोळसा वनक्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक कुलकर्णी आणि ताडोबाचे मुख्य लेखापाल असे दोघे गस्तीवर होते. एका वळणावर बिथरलेल्या हत्ती ‘गजराज’ ने चाल करून येत दोघांवर थेट हल्ला केला. हत्ती आज सकाळी अनियंत्रित झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांना नव्हती.

ADVERTISEMENT

मांजरीचं शेपूट कापल्याप्रकरणी थेट मुंबईच्या पोलीस ठाण्यात तक्रार

ADVERTISEMENT

या हल्ल्यात प्रमोद गौरकार नामक मुख्य लेखापाल यांचा जागीच मृत्यू झाला. ताडोबा कोअर क्षेत्रात बोटेझरी येथील हत्ती कॅम्पलगत झालेल्या या घटनेने वनविभाग हादरला आहे.

या घटनेनंतर हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले होते . वन्यजीव चिकित्सक ताडोबाच्या कोअर भागात बेशुद्ध करण्याच्या साधनांसह पोचले, याआधी गजराजने आपल्याच जानकीराम मसराम या माहुताला नोव्हे. 2019 मध्ये चिरडले होते. तर यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघीण प्रकरणाच्या सुमारास या हत्तीने कॅम्प सोडून पळ काढत गोंधळ घातला होता. ताडोबाचे लेखापाल प्रमोद गौरकार यांच्या मृत्यूने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कर्मचारीवर्गावर शोककळा पसरली आहे, ही घटना काल सायंकाळी 6 वाजता ची आहे आणि आज पहाटे 5 वाजता या हत्ती वर वन विभागाने नियंत्रण मिळवलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT