जगात भारी कोल्हापुरी! लीना नायर होणार Chanel या सुप्रसिद्ध कंपनीच्या ग्लोबल सीईओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जगात भारी कोल्हापुरी असं म्हणतात ना.. ते लीना नायर यांनी खरं करून दाखवलं आहे. होय Chanel या सुप्रसिद्ध फ्रेंच लक्झरी ब्रांड समूहाच्या ग्लोबल सीईओ म्हणून लीना नायर पदभार स्वीकारणार आहेत. त्याआधी त्या युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी अर्थात CHRO या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या आता Chanel या कंपनीच्या ग्लोबल सीईओ झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात त्या पदभार स्वीकारणार आहेत.

मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या लीना नायर यांची ग्लोबल कंझ्युमर गुड्स कंपनीत तीस वर्षांची कारकीर्द राहिली आहे. लीना नायर यांनी झारखंड येथील जमशेदपूर झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथे शिक्षण घेतलं आहे. तिथे त्यांनी सुवर्णपदकही जिंकलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लीना नायर यांचं कोल्हापूर कनेक्शन

लीना नायर यांचं कोल्हापूरशीही जवळचं नातं आहे. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरच्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले आहे. जमशेदपूरच्या झेवियर्स कॉलेजमधून जेव्हा त्यांना ऑफर आली तेव्हा त्यांना घरातल्यांची समजूत घालावी लागली आणि त्यांच्या मिनतवाऱ्या करून जमेशदपूरला पोहचावं लागलं. वडिलांना हे पटवून देण्यासाठी त्यांना खूप संघर्षही करावा लागला.

ADVERTISEMENT

लीना कोल्हापूरच्या ताराबाई पार्क भागात असलेल्या होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमधून 1985 ला दहावी पास झाल्या. लीना नायर या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. अभ्यास, नृत्य, खेळ या सगळ्या विषयांमध्ये त्या पुढे असत. लीना नायर या शेनेल या कंपनीच्या सीईओ झाल्याने कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनाही खूप आनंद झाला आहे. ज्या शाळेत लीना नायर शिकल्या ती शाळा मुलींची आहे. होली क्रॉस शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातून इंजिनिअरींगची डिग्री घेतली.

ADVERTISEMENT

लीना नायर यांनी झारखंडमधील जमशेदपूर येथील झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट (XLRI) येथे शिक्षण (1990-92) घेतले. तेथे त्यांनी सुवर्णपदकही जिंकले होते. त्याला अनेक एचआर एंटरवेंशनसाठी श्रेय मिळाले आहे. त्यापैकी एक आहे ‘करिअर बाय चॉईस’. ज्यांनी आपले करिअर सोडून दिले आहे, अशा महिलांना वर्कफोर्सचा एक भाग बनवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

लीना नायर या ग्लोबल कंपनीच्या सीईओ म्हणून नेतृत्व करणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला आहेत. या यादीत पहिलं नाव आहे ते इंद्रा नुई यांचं आहे. त्यांनी सीईओ म्हणून पेप्सिको कंपनीमध्ये काम केलं आहे. आता लीना नायर या भारतीय वंशाच्या आहेत त्यांचं कोल्हापूरशी खास कनेक्शन आहे कारण त्यांचं बालपण कोल्हापूरमध्ये गेलं आहे.

1969 मध्ये जन्मलेल्या लीना नायर 2013 मध्ये भारतातून लंडनला गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना अँग्लो-डच कंपनीच्या लंडन मुख्यालयात नेतृत्व आणि संघटना विकासाच्या जागतिक उपाध्यक्ष बनवण्यात आले. 2016 मध्ये त्या युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण सीएचआरओ (CHRO) बनल्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT