मगर हा एक असा उभयचर प्राणी आहे ज्याच्या जबड्यात कोणताही जीव सापडला तर, त्याची सुटका होणं अशक्य आहे.
मगर या प्राण्याच्या जबड्यात खूप ताकद असते. सॉल्टवॉटर मगरींच्या जबड्यात तर, 16,460 न्यूटन ताकद असते.
यापेक्षा अधिक शक्तिशाली जबडा प्रीट व्हाईट शार्कचा आहे. त्याच्या जबड्यात 18 हजार न्यूटनचं बळ आहे.
ग्रेट व्हाईट शार्क मोठ्या जीवांना मारतो. जबड्यात अडकलेल्या शिकारीवर 1835 किलो वजन असते.
T. Rex डायनासोरच्या जबड्याची ताकद नामशेष झालेल्या प्राण्यांमध्ये जास्त आहे. त्यांच्या जबड्याची ताकद 36 हजार न्यूटन होती.
सध्या सजीवांमध्ये ओर्का किलर व्हेलचे जबडे अधिक शक्तिशाली आहेत. त्यांचे 84,516 न्यूटनचं बळ जबड्यात आहे.
ओर्का किलर व्हेल शार्कचाही शिकार करतात. जाळ्यात अडकलेल्या शिकारीवर त्यांच्या जबड्याचे 8618 किलो वजन असते.
चॅम्पियन मॅग्लेडॉन हा नामशेष जीव होता. शार्कचा पूर्वज असल्याचं त्याला म्हटलं जायचं. त्यांच्या जबड्यात 182,200 न्यूटन बळ होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मॅग्लेडॉन खोट्या-मोठ्या बोटी गिळून टाकायचा.