भयंकर… हिमकडा कोसळल्याने नदीला महापूर, ५० जण वाहून गेल्याची भीती
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची एक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. हा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला असून पाण्याचे लोट प्रचंड वेगाने वाहत असून यामध्ये तब्बल 50 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना आज (७ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास […]
ADVERTISEMENT

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची एक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. हा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला असून पाण्याचे लोट प्रचंड वेगाने वाहत असून यामध्ये तब्बल 50 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना आज (७ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेनंतर आयटीबीपीचे २०० हून अधिक जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आता बचाव कार्य सुरु केलं आहे. याशिवाय SDRG च्या १० टीम देखील आता येथे पोहचल्या आहेत. ही संपूर्ण दुर्घटना लक्षात घेऊन प्रशासनाने हरिद्वार, ऋषिकेश आणि श्रीनगरमध्ये अलर्ट जारी केला आहे.
चमोली जिल्ह्यातील रैणी गावाच्या वरच्या बाजूस हिमकडा तुटल्याने येथून जवळच सुरु असलेल्या पॉवर प्रोजेक्ट ऋषि गंगाचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच धौली गंगा नदीला आलेल्या पुरामुळे जवळील धरणाचा काही भाग देखील तुटला असल्याचं समजतं आहे. निसर्गाचा हा प्रकोप अत्यंत भयंकर असून आतापर्यंत यामध्ये किती नुकसान झालं आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.
या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झालं असून आता एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहचणं सुरु झालं आहे. कोसळलेल्या हिमकड्यामुळे उद्भवलेली पूरपरिस्थिती अत्यंत भयंकर असून हा हिमकडा चमोलीहून थेट ऋषिकेशपर्यंत पोहचला आहे.
लोकांनी सुरक्षित स्थळी जावं, पोलिसांचं आवाहन