राज्यपालांनी घेतली CM शिंदेंच्या पत्राची दखल : ‘मविआ’ची 12 आमदारांची यादी अखेर रद्द

मुंबई तक

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या पत्राची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. यानुसार अखेर महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करण्यात आली आहे. राजभवनातून शनिवारी संध्याकाळी ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठविण्यात आली आहे. काल मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली 12 आमदारांची शिफारस मागे घेण्यासंदर्भात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या पत्राची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. यानुसार अखेर महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करण्यात आली आहे. राजभवनातून शनिवारी संध्याकाळी ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठविण्यात आली आहे. काल मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली 12 आमदारांची शिफारस मागे घेण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र पाठवले होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हा निर्णय म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला एक मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे सरकारकडून आता नवीन 12 नावांची शिफारस करण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी 12 आमदारांच्या रिक्त जागा भरण्यावर शिंदे सरकारचा भर असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या 12 नावांमध्ये भाजपला 8 आणि शिंदे यांना 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

‘दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा…’; श्रीकांत शिंदेंचं अजित पवारांच्या वर्मावर बोट

महाविकास आघाडी सरकारने केली होती १२ नावांची शिफारस

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांसाठी तिन्ही पक्षांतून नावांची शिफारस केली होती. तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी ४ नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेल्या शिफारशीला मंजुरीच दिली नाही.

आशिष शेलारांचा इशारा, उद्धव ठाकरेंनी पुन्हा डिवचलं; ‘कमळबाई’वरून वाद वाढणार?

हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेलं होतं. न्यायालय राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही. राज्यपालांनी किती कालावधीत हा निर्णय घ्यावा, हेही बंधनकारक नसल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं. त्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मंजुरी दिली गेली नाही. यावरून राज्यपालांवर बरीच टीकाही झाली होती.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून शिफारस करण्यात आलेल्या नावांपैकी काही नेते आता आमदार झाले आहेत. यात सचिन अहिर, एकनाथ खडसे हे विधान परिषदेवर गेले आहेत. तर रजनी पाटील या राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp