गुजरात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया; संजय राऊत म्हणतात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तराखंड, कर्नाटकनंतर भाजपनं गुजरातमध्येही मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला. विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू असून, शिवसेनेनंही यावर प्रतिक्रिया दिली. खासदार संजय राऊत यांनी गुजरातसह गोवा, उत्तर प्रदेशातील राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारच्या अस्थिरतेबद्दल विरोधकांकडून केल्या जात असलेल्या विधानांवर राऊत म्हणाले, ‘असा हवेत गोळीबार करून चालत नाही आणि कोणी कोणाच्या थोबाडीत वगैरे मारत नाहीत. चंद्रकांत पाटील असतील किंवा भाजपचे आणखी कोणी लोक असतील; ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात, तर त्यांनी तो आनंद घ्यावा पण वारंवार हेच सांगतो की हे सरकार पुढील तीन वर्ष देखील उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतर देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल’, असा दावा राऊत यांनी केला.

‘एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बदलणं हा त्या राज्याचा, पक्षाचा अंतर्गत विषय आहे. उत्तराखंड, कर्नाटकसह इतर ठिकाणी मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. हा त्या पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. हे सगळं त्या त्या पक्षाची हायकमांड ठरवत असते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री बदलला असेल, त्याच्यावरती इतरांनी भाष्य करण्याची गरज नाही. गुजरातमध्ये भाजपची स्थिती तितकीशी बरी नाहीये’, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गुजरात : मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं नाव चर्चेत

उत्तर प्रदेश निवडणूक व शेतकरी आंदोलनाबद्दल राऊत म्हणाले, ‘उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी संघटना आहेत. या संघटनांनी सांगितलं आहे की. तुम्ही (शिवसेना) निवडणूक लढा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इतर काही लहान पक्ष आहेत, त्यांनादेखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळणं गरजेचं आहे’, असंही राऊत यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

गोव्यात महाविकास आघाडी?

ADVERTISEMENT

‘गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये देखील ८० ते ९० जागा लढविण्याचा विचार सुरू आहे. तशी आमच्या पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. गोव्यामध्ये साधारणतः २० जागा लढविण्याचा आमचा विचार आहे. महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा विचार आहे. त्याला कितपत यश येते; त्यासंदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही. त्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगलं स्थान मिळालं, तर नक्कीच शिवसेना त्यांच्यामध्ये सहभागी होऊ शकेल’, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT