ऐकावं ते नवलच! माणसाच्या शरीरात डुकराचं हृदय बसवलं, आता कशी आहे रूग्णाची प्रकृती?
डॉक्टरांना किमयागार असं संबोधलं जातं. किमयागार हे डॉक्टरांचं नाव सार्थ करणारी गोष्ट अमेरिकेत घडली आहे. अमरिकेच्या डॉक्टरांनी एका माणसाच्या शरीरात चक्क डुकराचं हृदय बसवलं आहे. 57 वर्षीय डेव्हिड बेनेट यांच्यावर सात तास शस्त्रक्रिया करून त्यांच्या हृदयाच्या जागी डुकराचं हृदय ट्रान्सप्लांट म्हणजेच प्रत्यारोपित करण्यात आलं आहे. या आधारे ते किती काळ निरोगी आयुष्य जगतील हे आत्ता […]
ADVERTISEMENT

डॉक्टरांना किमयागार असं संबोधलं जातं. किमयागार हे डॉक्टरांचं नाव सार्थ करणारी गोष्ट अमेरिकेत घडली आहे. अमरिकेच्या डॉक्टरांनी एका माणसाच्या शरीरात चक्क डुकराचं हृदय बसवलं आहे. 57 वर्षीय डेव्हिड बेनेट यांच्यावर सात तास शस्त्रक्रिया करून त्यांच्या हृदयाच्या जागी डुकराचं हृदय ट्रान्सप्लांट म्हणजेच प्रत्यारोपित करण्यात आलं आहे. या आधारे ते किती काळ निरोगी आयुष्य जगतील हे आत्ता सांगता येणार नाही. मात्र अवयवदानाच्या दुनियेतला हा एक अनोखा प्रयोग आहे असं म्हटलं जातं आहे.
मंगळवारीच शरद पवारांवर का करण्यात आली शस्त्रक्रिया? डॉक्टरांनी सांगितलं कारण
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने सोमवारी एक पत्रक जारी केलं. त्यांनी ही शस्त्रक्रिया म्हणजे ऐतिहासिक पाऊल आहे असं म्हटलं आहे. ट्रान्सप्लांट केल्यानंतर रूग्णाच्या आजारावर उपचार केले जाणं अद्याप निश्चित नाही मात्र डुकराचं हृदय माणसाला लावण्याची ही शस्त्रक्रिया आरोग्य क्षेत्रातला मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे.
एका न्यूज एजन्सी दिलेल्या माहितीनुसार मेरीलँड या ठिकाणी राहणारे डेव्हिड बेनेट नावाच्या एका माणसाला गंभीर आजार होते. हार्ट ट्रान्सप्लांट त्यांच्यासाठी योग्य नव्हतं. मात्र त्यांचा जीव वाचणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे लवकर निर्णय घेणं आवश्यक होतं. कारण डेव्हिड यांची प्रकृती बिघडत होती. शेवटी डेव्हिड यांच्या शरीरात डुकराचं हृदय लावण्यात आलं.