Rain Update नागपूरमध्ये संततधार, येत्या 36 तासातही मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

नागपुरात आज दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचले असून नरेंद्र नगर कडून छत्रपती नगर कडे जाणार हा पूल पाण्याखाली आल्याने बंद करण्यात आला असून पुलाच्या दुसऱ्या बाजूने वाहतूक वळवण्यात आलेली आहे.. हवामान खात्याने येत्या 36 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे..नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कोलार नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या परिसरातील काही नागरिकांना नगर परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालय कडून मिळाली आहे.. सावनेर तालुक्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 148 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचे येथे आज सकाळी मुसळधार पाऊस झाल्याने गावाच्या बाजूला गरजधरी धरण ओहरफ्लो झाल्यामुळे धरणाची भिंत फुटली व संपूर्ण पाणी हे गावामध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर काही नागरिकांची वाहने सुद्धा या पाण्यामध्ये वाहून गेले. अचानक आलेल्या पावसाने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेसंदर्भात प्रशासनाला माहिती देण्यात आलेली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यांतील दहेगाव नाल्यात एक जण वाहून गेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, काही लोकांच्या समक्षच हा प्रकार घडला आहे. विजय येलुतवाड असं या तरुणाचं नाव असल्याचं समजतं आहे. कुपटी येथील हा तरुण कुपटीहून दहेगावला जात होता. रस्ता ओलांडत असताना त्याचा तोल गेल्याने तो नाल्याच्या पुरात वाहून गेला. या घटनेचा व्हीडिओ उपस्थितपैकी एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. दरम्यान, तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी तात्काळ शोध मोहीम सुरु केली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात रात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना पूर आला असून हे पाणी शेतात ही साचले आहे. यामुळे अनेक शेतांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे सोयाबीन, कापसाचे पीक धोक्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT