गुप्तधनाचं आमिष दाखवून शेतकऱ्याला संपवलं, हिंगोलीतल्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंगोलीच्या वाढोना शिवारात एका विहीरीत पोत्यात दगडासह आढळलेल्या एक मृतदेह पोलिसांना सापडला होता. या व्यक्तीच्या हत्येमागंच गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. शिवाजी काटकर असं या मयत शेतकऱ्याचं नाव असून गावातील जुन्या वादातून डुख धरुन आरोपीने गुप्तधनाचं आमिष दाखवत शिवाजी काटकर यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे.

मुख्य आरोपी रामदास झुंगरे याला पोलिसांनी या हत्येच्या आरोपाखाली अटक केली असून या घटनेत सहभागी झालेल्या तीन इतर आरोपींचा शोध सुरु आहे. झुंगरे हे माजी उपसरपंच आहेत.

वाढोना शिवारात पान कण्हेरगाव येथे आरोपी रामदास झुंगरे आणि मयत शेतकरी शिवाजी काटकर हे रहायचे. माझ्याघराकडे एकटक पाहत असतो यावरुन एकदा झुंगरे आणि काटकर यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर झुंगरेच्या मनात काटकर यांच्याविषयी राग खदखदत होता. काटकर यांना गुप्तधनाची लालसा असल्याचं झुंगरे याला समजलं होतं. याचाच वापर करुन झुंगरेने शिवाजी काटकर यांना काटा काढायचं ठरवलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला भावाचा विरोध, होणाऱ्या नवऱ्यासह बहिणीवरही चाकूने हल्ला

शिवाजी काटकरला विश्वासात घेऊन आरोपी झुंगरेने गुप्तधन शोधून देणारे माझ्या ओळखीचे आहेत. ते पैसे दुप्पट करुन देतात असं आमिष दाखवलं. यानंतर शिवाजी काटकरने आपल्याजवळील काही पैसे आणि नातेवाईकांकडून उधार घेत काही रक्कम जमा केली. आरोपी झुंगरेने १५ फेब्रवारीला काटकर यांना पैसे घेऊन वाढोना शिवारात येण्यासाठी सांगितलं. दुप्पट पैशाच्या हव्यासापोटी काटकर याठीकाणी गेलेही.

ADVERTISEMENT

‘ती’ हत्या घरगुती वादातून नाही! बायको आणि मुलीचं प्रेमप्रकरण समजल्यामुळे वडिलांनी गमावला जीव

ADVERTISEMENT

यानंतर तिथे उपस्थित असलेल्या झुंगरेने आपल्या तीन साथीदारांसह काटकर यांच्याकडील २ लाख रुपये, दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने काढून घेत त्यांचे हातपाय बांधले. यानंतर रुमालाने गळा आवळून त्यांची हत्या केली. यानंतर शिवाजी काटकरचा मृतदेह पोत्यात भरुन त्याला दगड अडकवून आरोपींनी तो जवळच्या विहीरीत टाकला. दहा दिवस पाण्याखाली राहिल्यानंतर मृतदेह वर आल्यामुळे या प्रकरणाचं बिंग फुटलं.

स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून पत्नीला जिवंत जाळलं, उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू

सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत या प्रकरणातील मुख्य आरोपी झुंगरेला अटक केली आहे. याचसोबत अन्य तीन आरोपींचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. खून आणि पुरावे नष्ट केल्याच्या कलमाखाली आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

फ्लोअर मिलच्या पट्ट्यात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, साफसफाई करणं बेतलं जिवावर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT