'ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांनी माझ्यासोबत...' मामा अन् भाच्याने नर्सवर केला सामूहिक बलात्कार
एका खासगी रुग्णालयातील नर्सवर रुग्णालयाच्या संचालकाने आणि त्याच्या भाच्याने लैंगिक अत्याचार केला आहे. कानपूरमधील या पीडितेने अखेर त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांनी माझ्यासोबत...
मामा अन् भाच्याने नर्सवर केला सामूहिक बलात्कार
Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सने गंभीर आरोप केले आहेत. तिने रुग्णालय संचालक आणि त्याच्या भाच्यावर सामूहिक बलात्कार, अश्लील फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग आणि सतत शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुग्णालय संचालक सत्यम सैनी आणि त्याचा पुतण्या ललित सैनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. पीडिता ही मूळची कानपूर भागातील असून ती 10 जुलै 2026 पासून या रुग्णालयात कामाला होती. नोकरीदरम्यान आरोपी तिच्यासोबत अश्लील चाळे करत असत आणि विरोध केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत असत, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ऑपरेशन थिएटरमध्येही वारंवार अत्याचार
तक्रारीनुसार, 16 ऑगस्ट रोजी रुग्णालयात आपत्कालीन प्रसूतीची केस आल्याचे सांगून सत्यम सैनी याने पीडितेला कारमधून नेले. मात्र रुग्णालयात नेण्याऐवजी तो तिला एका हॉटेलमधील खोलीत घेऊन गेला, जिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यादरम्यान तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या भावाला आणि तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर या फोटोंचा धाक दाखवून रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्येही आरोपींनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी ललित सैनी यानेही तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला हलवला, राज ठाकरे संतापले, मोदी-शाहांवर हल्लाबोल
नर्सच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
सततच्या शोषणाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेने 1 सप्टेंबर रोजी घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. तिच्या पतीने जेव्हा सत्यम सैनी याला फोन करून विरोध दर्शवला, तेव्हा त्यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर पीडितेने कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत सत्यम सैनी आणि ललित सैनी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
हे ही वाचा : धाराशिव : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली, जोरदार घोषणाबाजी
सामूहिक बलात्काराचा गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जात आहे. पोलीस सध्या पीडितेचा प्रकरणातील जबाब नोंदवणे, घटनास्थळांची पाहणी करणे आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी करणे यांसारखी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. नोकरीच्या ठिकाणाहून सुरू झालेला हा प्रकार गंभीर गुन्हेगारी वळणावर पोहोचला असून पोलीस सर्व बाजूंचा कसून तपास करत आहेत.
