जास्तीच्या सुट्ट्या पाहिजेत, मग थेट वर्गमित्राच्या हत्येचा कट रचला, पण काय घडलं?

मुंबई तक

Crime News : गणेश चतुर्थीच्या आधी अधिक सुट्टी मिळावी, या विचारातून आंध्र प्रदेशातील दोन विद्यार्थ्यांनी वर्गमित्राला झोपेत गुदमरवून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले असून, पोलीस आणि शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जास्तीच्या सुट्ट्या पाहिजेत

point

मग थेट वर्गमित्राच्या हत्येचा कट रचला, पण काय घडलं?

Crime News : आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुट्टी वाढवण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी वर्गमित्राची झोपेत हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. निवासी शाळेच्या वसतिगृहात 4 सप्टेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. गणेश चतुर्थीच्या आधी अधिक दिवसांची सुट्टी मिळावी, या विचारातून दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्राला झोपेत गुदमरवून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर जिल्हा शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली असून, दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.

हेही वाचा : 'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?

आवाज ऐकून वसतिगृहातील इतर विद्यार्थी जागे झाले अन्... 

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या वसतिगृहातील एका खोलीत सुमारे 15 विद्यार्थी झोपले होते. त्यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोबत राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला गुदमरवण्याचा प्रयत्न केला. त्याचा गळा दाबण्यात आल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याने झटापट करत आरडाओरड केली. त्याचा आवाज ऐकून वसतिगृहातील इतर विद्यार्थी जागे झाले आणि त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर वसतिगृहाचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी तातडीने तेथे पोहोचले आणि संबंधित विद्यार्थ्याची सुटका केली. पीडित विद्यार्थ्याने दोन्ही विद्यार्थ्यांनी आपला गळा दाबल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर त्या दोघांना रात्रीसाठी इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना घरी पाठवले.

हेही वाचा : वेदर रिपोर्ट : मराठवाड्याला दिलासा मिळणार? कोणत्या तारखांना मुसळधार पाऊस?