Maharashtra Unlock: 15 ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल्स, मॉल्स, दुकानं रात्री 10 पर्यंत सुरू राहणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटची बैठक पार पडल्यानंतर आता एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हॉटेल्स, रेस्तराँ, मॉल्स आणि दुकानं हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. 15 ऑगस्टपासून हा निर्णय अंमलात आणला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या आठवड्यात हॉटेल आणि रेस्तराँ मालकांच्या असोसिएशनचं शिष्टमंडळ भेटलं होतं. तुम्हाला लवकरच दिलासा देण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं होतं त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना यासंदर्भातला प्रस्ताव समोर आला. ज्यानंतर यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे हॉटेल्स, रेस्तराँ आणि मॉल्स यांना दिलासा देण्यात आला असला तरीही धार्मिक स्थळं, सिनेमागृहं आणि नाट्यगृहं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहेत.

उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याला जास्तीत जास्त 200 संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये 50 टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व हॉटेल्स, दुकानं आणि रेस्तराँ ही आता रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहेत. कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं हे मात्र बंधनकारक असणार आहे. हॉटेलच्या मालकांनी, कर्मचाऱ्यांनी आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी कोव्हिड प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसं न आढळून आल्यास कारवाई केली जाईल असाही इशारा देण्यात आला आहे.

हॉटेलमध्ये वेटर्सनीही मास्क घालणं बंधनकारक आहे. वेटिंग असेल तर वेटिंगवर असलेल्या लोकांनीही मास्क घालणं आणि कोव्हिडच्या सगळ्या निर्बंधांचं पालन करणं आवश्यक आहे. कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं ही हॉटेल आणि रेस्तराँ सुरू करायची आहेत. कोव्हिड प्रोटोकॉलची जबाबदारी मालकांची असणार आहे. ते त्यांनी पाळले नाहीत तर त्यांच्यावर कारवाईही केली जाईल असंही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT