छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडला गेली कशी?
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत. त्यांची भवानी तलवार ही आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या जगदंबा तलवारीचाही शोध लागला आहे. ही तलवार लंडनमध्ये आहे. ही तलवार २०२४ च्या आधी परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगदंबा तलवारीची चर्चा सुरू झाली […]
ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत. त्यांची भवानी तलवार ही आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या जगदंबा तलवारीचाही शोध लागला आहे. ही तलवार लंडनमध्ये आहे. ही तलवार २०२४ च्या आधी परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगदंबा तलवारीची चर्चा सुरू झाली आहे. आपण जाणून घेणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांची एक तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यावर
छत्रपती शिवाजी महाराज यांची एक तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. या तलवारीचं संवर्धन करण्याचं काम संभाजीराजे छत्रपती आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. या मंदिरात ही तलवार जतन करून ठेवण्यात आली आहे.
२०२१ मध्ये काय जगदंबा तलवारीबाबत काय माहिती समोर आली?
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार ही इंग्लंडच्या राणीच्या वैयक्तिक संग्रहालयातील रॉयल कलेक्शनमध्ये ठेवण्यात आल्याचे ठोस पुरावे सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तयार केलेल्या कॅटलॉगमुळे मिळाले. ही माहिती सह्याद्री इतिहास संशोधन समिती केंद्राचे सचिव अमित आडसुळे आणि शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे अध्यक्ष हर्षल सुर्वे यांनी दिली होती. यावेळी आडसुळे यांनी ही माहिती दिली होती की चौथे शिवाजी महाराज यांनी १८७५ मध्ये भारत भेटीवर आलेल्या ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्सला एक तलवार आणि एक कट्यार भेट दिली होती. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार होती. इंद्रजित सावंत यांनी पुस्तकातही ही बाब मांडली आहे. मात्र कॅटलॉगमुळे ही तलवार राणी वैयक्तिक संग्रहालयात असल्याचं सिद्ध झालं.