माझा आणि सचिन वाझेंचा कधीच संबंध आला नाही-अजित पवार
माझा आणि सचिन वाझेंचा कधीच संबंध आला नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सचिन वाझेंची चौकशी करण्यात येते आहे, त्यातून सत्य बाहेर येईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. सचिन वाझे यांचं एक कथित पत्र प्रसारमाध्यमांमध्ये समोर आले आहे. यामध्ये सचिन वाझे यांनी अनिल परब, अनिल देशमुख यांची नावं घेतली आहेत. त्यांनी […]
ADVERTISEMENT

माझा आणि सचिन वाझेंचा कधीच संबंध आला नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सचिन वाझेंची चौकशी करण्यात येते आहे, त्यातून सत्य बाहेर येईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
सचिन वाझे यांचं एक कथित पत्र प्रसारमाध्यमांमध्ये समोर आले आहे. यामध्ये सचिन वाझे यांनी अनिल परब, अनिल देशमुख यांची नावं घेतली आहेत. त्यांनी पैशांची वसुली करण्यासाठी सांगितलं होतं असं सचिन वाझेंनी म्हटलं आहे. तर दर्शन घोडावत या माणसाने मला मी अजित पवारांचा निकटवर्तीय आहे असं सांगत संपर्क केला होता आणि गुटखा व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सांगितलं होतं असंही या कथित पत्रात म्हटलं आहे. याबाबत अजित पवार यांना विचारला तेव्हा चौकशीत सत्य बाहेर येईल असं म्हटलं आहे.
तुरुंगातल्या लोकांकडून पत्र लिहून घेण्याची फॅशन महाराष्ट्रात आली आहे-संजय राऊत
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीच्या निमित्ताने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूरला आले आहेत.यावेळी बोलताना अजित पवार यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.तर यावेळी भाषण करताना अजित पवारांना “मास्क काढा” असं लिहिलेली चिठ्ठी आली. त्यावर अजितदादांनी “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा” असं म्हणत त्या कार्यकर्त्याला झापताच एकच हशा पिकला.
स्वतःचं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस”
परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या देशात लस द्या. स्वतःचं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस दिले जाते. आपल्याकडे यंत्रणा आहे. सीरम इन्स्टिट्युटवर केंद्राची अखत्यारी आहे, नाहीतर आम्ही सीरमला लस द्यायला सांगितलं असतं. मात्र राजकारण केले जाते आहे. ‘लोकांना लॉकडाऊन नको आहे. शेवटी माणसंही जगली पाहिजेत. 18 वर्षांच्या पुढील लोकांना लस द्या’ असंही अजित पवार म्हणाले.
Sachin Vaze यांच्या कथित पत्रामुळे खळबळ, पत्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांची नावं
कल्याणराव काळे पवार साहेबांकडे चालले, असं समजलं की भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं. भाजपमध्ये कल्याणरावचे कल्याण झाले का? आता राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करायला लागल्यावर घरी चकरा मारायला लागले म्हटल्यावर कल्याणरावांची आता आठवण झाली त्यांना.
आता का त्यांना पुळका आला आहे हे आपल्याला माहित आहे. म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली. तीन पक्ष एकत्र आल्याने काही जणांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे असंही अजित पवार म्हणाले.