Mumbai Tak /बातम्या / ‘मी मरण पत्करेन, पण..’, हक्कभंग आल्यानंतर संजय राऊतांची तुफान फटकेबाजी
बातम्या राजकीयआखाडा

‘मी मरण पत्करेन, पण..’, हक्कभंग आल्यानंतर संजय राऊतांची तुफान फटकेबाजी

Sanjay Raut Kolhapur Speech: कोल्हापूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात एकीकडे हक्कभंग (privilege motion)आलेला असताना दुसरीकडे संजय राऊतांनी कोल्हापूरच्या (Kolhapur) एका जाहीर सभेत जोरदार भाषण केलं आहे. ’40 गद्दार शिवसेनेला सोडून गेले.. त्याने फार काही फरक पडत नाही. मला पण धमक्या आल्या.. पक्ष सोडण्यासाठी पण एकवेळ मी मरण पत्करेन, पण भगवा सोडणार नाही.. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडणार नाही…’ असं म्हणत संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या इतर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. (i will die but I will not bow down to bjp sanjay rauts stormy speech in kolhapur after privilege motion in the assembly)

शिंदे गटात (Shinde Group) जे गेले, ते तिकडे जाऊन वॉशिंग मशीनमध्ये साफ झाले.. अशी खरमरीत टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली. यावेळी राऊतांनी शिंदे गटात गेलेल्या नेत्यांवर टीका तर केलीच पण त्यांनी यावेळी भाजप आणि किरीट सोमय्यांवर जोरदार प्रहार केला.

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या होत्या. त्यावेळी किरीट सोमय्या म्हणालेले की, ‘मी तुमच्या प्रतापला तुरूंगात टाकणार’ असे म्हणत होते. मात्र आता प्रताप सरनाईकांनी पक्ष सोडला आणि ते धुवून साफ झाले.. असे देखील राऊत म्हणाले.

“संजय राऊतांना अटक करा”; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “त्याची सर्वांनी तयारी ठेवा”

भावना गवळीला ईडीने सहा वेळा वॉरंट पाठवले, तिच्या पीएला अटक केली होती. त्यावेळी बाई घाबरल्या होत्या, आम्ही तिला मदत करत होतो.. पण त्या बाई अटकेला घाबरल्या, त्यांनी पक्ष बदलंला.. आता वॉरंटही गेलं आणि समन्सही गेलं, सगळ साफ झालं.. असं म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली.

दुसरीकडे यशवंत जाधव यांना किती वेळा स्थायी समितीचं चेअरमन केलं उद्धव ठाकरेंनी? मुंबई महापालिकेने चार वेळा स्थायी समितीचं चेअरमन केलं.. पण इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय मागे लागल्यावर हे असे सगळे, एकत्र टोळी करून पळून गेले आणि आता तिथे गेले आणि वॉशिंग मशीनमध्ये साफ झाले.. असं म्हणत संजय राऊतांनी या सगळ्यांवर टीकेची झोडच उठवली.

Raut: संजय राऊत कायद्याच्या कचाट्यात? शिवसैनिकाची तक्रार, गुन्हा दाखल

मोदींना टक्कर देणारा एकच नेत.. ते म्हणजे उद्धव ठाकरे!

दरम्यान, याचवेळी संजय राऊतांनी भाजपसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली. ‘पंतप्रधान मोदींना उभ्या भारतात टक्कर देणारा एकच नेता आहे.. आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे… आणि हीच भीती त्यांच्या मनात कायम आहे. ही भीती असल्याने पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनीच या ४० गद्दारांच्या हातात महाराष्ट्राच्या चाव्या दिल्या आहेत. पण काहीही केलं तरी शिवसेना कधीही संपणार नाही.’ असं म्हणत संजय राऊत यांनी यावेळी थेट पंतप्रधान मोदींनाच टार्गेट केलं.

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा