रामदेवबाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, IMA ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगगुरू रामदेवबाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता IMA ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. रामदेवबाबांनी कोरोना लसीबाबत केलेलं वक्तव्य हे चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. एवढंच नाही तर त्यांनी डॉक्टरांबाबतही रामदेवबाबांनी चुकीची वक्तव्यं केली आहेत त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता IMA ने केली आहे.

रामदेवबाबा यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भर पडताना दिसते आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत त्यांना कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर आता रामदेवबाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी IMA ने केली आहे, Whats App मेसेजवरून जो वाद सुरू झाला होता तो वाद आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यापर्यंत येऊन पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी रामदेवबाबांनी अॅलोपॅथीची खिल्ली उडवली होती. ते वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडलं आहे.

Allopathy चा अभ्यास केला आहे का? विचारत मुंबईच्या डॉ. लेलेंनी केली बाबा रामदेव यांची बोलती बंद

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बाबा रामदेव यांनी काय वक्तव्य केलं होतं?

एक हजार डॉक्टर कोरोना लसीचे डोस घेऊनही मेले.. हे कसले डॉक्टर? जे स्वतःला वाचवू शकले नाहीत त्यांच्या डॉक्टर असण्याला काय अर्थ आहे? allopathy हे एक स्टुपिडिटी आहे. डॉक्टर व्हायचं असेल तर स्वामी रामदेवसारखं बना ज्याच्याकडे कोणतीही डिग्री नाही आणि तरीही सगळ्याचा डॉक्टर आहे.

ADVERTISEMENT

बाबा रामदेव यांनी केलेले हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. ज्यानंतर IMA ने त्यांना नोटीसही पाठवली. FAIMA ने असं म्हटलं आहे की आम्ही सगळ्या देशातील निवासी डॉक्टरांच्या असोसिएशनच्या वतीने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवत आहोत. तसंच बाबा रामदेव यांनी जे वक्तव्य Allopathy बाबत केलं त्याचा आम्ही तीव्र निषेध नोंदवतो.

ADVERTISEMENT

Allopathy डॉक्टर्स विरुद्ध रामदेव बाबा वाद चिघळला, २५ प्रश्न विचारत रामदेव बाबांचं IMA ला आव्हान

एवढंच नाही तर FAIMA ने असंही म्हटलं आहे की बाबा रामदेव यांनी आपला दावा मागे घेतल्याचे पुरावे द्यावेत किंवा जाहीरपणे माफी मागावी. या दोन्हीपैकी एकही पर्याय जर त्यांनी स्वीकारला नाही तर त्यांच्यावर आम्ही कायदेशी कारवाई करणारच अशी आक्रमक भूमिका FAIMA ने घेतली आहे. ही भूमिका घेतल्यानंतर बाबा रामदेव यांनी माफीही मागितली. मात्र या संदर्भात जे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये डॉ. जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलतीच बंद केली. हा व्हीडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT