माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा घोटाळा, आरोपीचं गुजरात कनेक्शन

मुंबई तक

Majhi Ladki Bhahin scheme : माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आरोपींचे गुजरातशी संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

Majhi Ladki Bahin yojana Under Cyber Crime
Majhi Ladki Bahin yojana Under Cyber Crime
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा घोटाळा.

point

आरोप्यांचं गुजरात कनेक्शन आहे.

Majhi Ladki Bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मदतीचे खोटे आश्वासन देणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या योजनेअंतर्गत सायबर गुन्हे आणि मनी लॉन्ड्रिग प्रकरणातून उकळलेले पैसे इतर लोकांच्या बनावट बँक खात्यात जमा करण्यात आले. पुरुषांसह अनेक लोकांच्या नावे बँक खाती उघडण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अविनाश कांबळे (वय 25)  आणि अन्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

हेही वाचा : "पापाचा घडा भरला होता, पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं...", लेफ्टनंट जनरल म्हणाले आरपारची तयारी होती

या प्रकरणात अधिकाऱ्यांनी माहिती देत मोठा गौप्यस्फोट केला की, या खात्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत. यामुळे अवैधमार्गे मिळवलेल्या काळ्या पैशांचे पांढऱ्या पैशात रूपांतर करणे हा काळाबाजार समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशातच पोलिसांनी केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. 

पोलिसांनी सांगितले की, गरीब वर्गातील निष्पाप जनतेला आमिष दाखवत आरोपी त्यांचे बँक खाते सायबर गुन्हेगारांना विकले जात होते. जुहू पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, यामध्ये 2 हजार 500 बँक खाती उघडण्यात आली आहेत. 

हे वाचलं का?