नागपूरमध्ये स्वतःचं सरण रचून वृद्धाची आत्महत्या, मृत्यूच्या आधी पूजा केल्याचंही समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधु आत्माराम ठवकर यांचे वडील आत्माराम मोतीराम ठवकर (८०) यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःच सरण रचून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना नागपूरमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 1 मार्चला घडली आहे.

स्वतःचं सरण रचून आत्महत्या करण्यापूर्वी आत्माराम यांनी विधिवत पूजा अर्चा केली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी दि.१ मार्चला किन्ही गावाबाहेरील असलेल्या त्यांच्याच शेतात भारत गॅस गोडाऊनच्या बाजूला आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली. मृतक आत्माराम हे वारकरी होते. धार्मिक वृत्तीचे होते तसेच ते नेहमी आजारी असायचे. मात्र काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चांगली झाली होती. असं असूनही त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याची चर्चा गावात सुरू आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

औरंगाबादमध्ये 29 वर्षीय विवाहितेची विष पिऊन आत्महत्या, कारण अद्याप स्पष्ट नाही

महाशिवरात्रीच्या दिवशी गावात मंडई निमित्त सुरू असलेले झाडीपट्टीतील नाटकाचा आनंद रात्रभर घेतला. पहाटे पाच वाजता शेताकडे आले. शेतात असलेले लाकूड एकत्र करून सरण रचले. त्यावर तणस टाकली. त्याअगोदर पूजा केली असावी कारण सरणाजवळ दिवा पेटत होता. तसेच पानाचा विडा ठेवलेला होता. त्यानंतर त्यांनी सरण पेटवून त्यावर झोपले असावे. मात्र त्यांचे पार्थिव अर्धवट जळालेले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

बीड : ८ तासांत तिघांच्या आत्महत्या, माजलगाव तालुक्यातील घटना

ADVERTISEMENT

ही घटना समजताच वेलतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी पंचनामा केला आणि पार्थिव उत्तरीय तपासणी साठी वेलतुर येथे पाठविण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत ठाणेदार आनंद कविराज यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. नितेश डोर्लीकर आणि शिपाई सुरपाम पुढील तपास करीत आहे. दरम्यान स्वतःच सरण रचून ८० वर्षीय वृद्धाने आत्महत्या कशी काय केली असावी,असा प्रश्न अनुत्तरित राहतो.वृद्ध माणूस सर्व काही आलबेल असताना आत्महत्येचा विचार कसा काय करू शकतो. तोही स्वतःच सरण रचून स्वतः आगीच्या स्वाधीन होऊन आत्महत्या कशी काय करू शकेल?असे नानाविध प्रश्न उपस्थित होत आहे.परंतु घरच्यांचे काही म्हणणे नसल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत गुन्हा तपासात ठेवला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT