IND vs AUS: टीम इंडियाची विजयाची हॅट्रिक हुकली, ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय

मुंबई तक

India vs Australia Indore Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने 9 विकेट राखून हा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा शिल्पकार नाथन लायन आणि ट्रेविस हेड ठरला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा विजयरथ रोखला आहे. तसेच मालिका आता 2-1 वर गेली आहे. आता चौथा टेस्ट सामना दोन्ही […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

India vs Australia Indore Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने 9 विकेट राखून हा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा शिल्पकार नाथन लायन आणि ट्रेविस हेड ठरला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा विजयरथ रोखला आहे. तसेच मालिका आता 2-1 वर गेली आहे. आता चौथा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे. (ind vs aus 3rd test team india loss indore test australia’s first win border gavaskar trophy)

Sandeep Deshpande: मोठी बातमी… मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

असा रंगला पहिला डाव

तिसऱ्या टेस्ट सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा त्याच्या निर्णय चुकीचा ठरला होता. कारण पहिल्याच डावात संपूर्ण संघ 109 धावांत ऑल आऊट झाला होता. टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या करता आली नाही. या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 197 धावा करत 88 धावांची आघाडी घेतली.ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 60 धावा केल्या होत्या.

दुसऱ्या डावात काय झालं?

दुसऱ्या डावात टीम इंडिया (Team India) चांगल्या स्थितीत होती. एकावेळेस टीम इंडियाने 54 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे टीम इंडिया सहज 250 धावा करून ऑस्ट्रेलियासमोर 150 हून अधिक धावांचे लक्ष्य ठेवू शकेल असे वाटत होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने टीम इंडियाची ही योजना हाणून पाडली. नॅथन लायनने 64 धावा देत 8 विकेट घेतल्या आणि संपूर्ण भारतीय संघ 163 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून फक्त चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 59 धावा ठोकल्या. या त्याच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांचे माफक लक्ष्य होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp