Mumbai Tak /बातम्या / India Today Conclave 2023 : वाढत्या वयाला कसं थांबवायचं? ‘हा’ आहे फॉर्म्यूला
बातम्या

India Today Conclave 2023 : वाढत्या वयाला कसं थांबवायचं? ‘हा’ आहे फॉर्म्यूला

India Today Conclave 2023 :

नवी दिल्ली : वाढतं वय आणि येणार वृद्धत्व हा आजच्या काळातील मोठ्या चिंतेचा विषय झाला आहे. पण आता या वाढत्या वयावर आणि वृद्धापकाळावर मात करून सदैव तरुण कसं राहायचं याबाबत मोठं रहस्य हार्वर्ड मेडिसिन स्कूलचे प्रोफेसर डेव्हिड सिंक्लेअर (Dr David Sinclair) यांनी सांगितलं आहे. ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये रिव्हर्स एजिंग या विषयावर बोलत होते. (The Harvard Medical School professor was discussing ‘Bio Switches and Age Clocks)

वय बदलाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, डॉ. सिंक्लेअर म्हणाले, विज्ञान अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथं आपल्याला वय रिव्हर्सल म्हणजे काय हे समजून घेता येतं. तंत्रज्ञान आता झपाट्याने प्रगती करत आहे. वास्तविक जीन्स आपलं वय ठरवत असतात आणि आपल्यापैकी बहुतेक जण परिपूर्ण जनुकांसह जन्माला येत नाहीत. आपल्या शरीरात उपलब्ध असलेल्या पेशींचा आपल्याला तरुण ठेवण्यासाठी एक बॅकअप असतो आणि आपण विज्ञानाद्वारे त्याचा वापर करायला शिकलो आहोत. रिव्हर्स एज आणि बायो स्विचचे तंत्रज्ञान आपल्या अपेक्षेपेक्षा वेगाने विकसित होत आहे.

डॉ. सिंक्लेअर म्हणाले की 20 वर्षांपूर्वी, “व्यक्ती कधीही वृद्ध होत नाही” असं कोणी बोलायचो तेव्हा त्याला वेडं समजलं जायचं”. पण आता आपल्याला त्याचं महत्त्व समजलं आहे. आपल्याला तरुण ठेवण्याचं सूत्र आपल्या शरीरातच आहे. त्याचा वापर कसा करायचा हे आपण शिकलो आहोत.

माणूस ठरवेल स्वत:च्या मृत्यूची तारीख :

डॉ. सिंक्लेअर यांनी सांगितलं, आपल्या शरीरातील जीन्स आपले वय ठरवतात. काही लोकांच्या शरीरात चांगले जीन्स असतात, ज्यामुळे ते 100 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगू शकतात. कधीही वृद्धत्व न होण्यासाठी काय खावं, कसं खावं, केव्हा खावं, केव्हा झोपावं, किती विश्रांती घ्यावी या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. वृद्धत्व थांबवणं सोपं आहे, पण यासाठी आपल्या शरीराला आरामदायी स्थितीतून बाहेर काढावं लागेल. आपण आपल्या शरीराला जितकं अनकंफर्टेबल ठेवू तितकाच आपल्याला फायदा होईल.

India Today Conclave 2023 : PM मोदींनी स्वप्न पाहायला शिकवलं : अमित शाह

उदाहरणार्थ, एखाद्याने जड जेवण टाळावं, साखर आणि उच्च कॅलरी उत्पादनांपासून दूर राहावं, दारुपासून दूर राहावं. मी वेळेनुसार जेवण टाळायला शिकलो आहे. आता पोटभर एकत्र जेवण करणं हा माझा उद्देश नसतो. मी आठवड्यातून एकदा मनापासून जेवतो. साखर शरीरासाठी विषारी आहे, ती सोडायला हवी. सहसा आपण दिवसातून तीन वेळा खातो, जे चांगलं नाही. दिवसातून फक्त दोन वेळा जेवा. नियमित व्यायाम करा. स्ट्रेचिंग, मेडिटेशन आणि योगासने तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करा.

India Today Conclave : ‘वनडे क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी…’,सचिन तेंडुलकरने सांगितला प्लान

तरूण राहण्यासाठी डाएट :

ते म्हणतात की आपण भरपूर अन्न खाणं टाळावं. शक्य तितकं कमी जेवा. सहसा दिवसातून तीन वेळा खातो पण ही सवय टाळा. शक्यतो दिवसातून दोनदा जेवा. पण दोनदा जास्त खाऊ नका. शक्य असल्यास, मध्ये हेल्दी स्नॅक्स घ्या. उच्च कॅलरी आणि उच्च प्रथिनयुक्त पदार्थांपासून स्वतःवा लांब ठेवा. वनस्पती आधारित आहार सर्वात योग्य आहे.

वनस्पतींमध्ये असलेल्या प्रथिनांमध्ये अमिनो अॅसिड असते, हे दीर्घायुषी होण्यास मदत करते. शाकाहारी आहार आणि रेड वाईनचे सेवन करा. मी स्वतः वनस्पती आधारित अन्न खातो आणि मला चांगले परिणाम मिळाले आहेत, माझी त्वचा चांगली झाली आहे, माझी स्मरणशक्ती देखील वाढली आहे. दिवसातून तीन वेळ खाणे आणि मध्येच स्नॅक्स खाणे या सवयीमुळे आपण लवकर वृद्धत्वाकडे जातो, असं त्यांनी सांगितलं

2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव