कोरोना लस, Oxygen उपकरणांवरील Custom Duty तीन महिन्यांसाठी माफ

मुंबई तक

गेल्या काही दिवसांपासून देशातील महत्वाच्या राज्यांत वाढत असलेले कोरोना रुग्ण आणि रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिन्यांसाठी कोरोना लस, ऑक्सिजन व इतर वैद्यकीय उपकरणांवरील कस्टम ड्युटी माफ केली आहे. देशभरात १ मे पासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. मुंबईत 12 रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून देशातील महत्वाच्या राज्यांत वाढत असलेले कोरोना रुग्ण आणि रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिन्यांसाठी कोरोना लस, ऑक्सिजन व इतर वैद्यकीय उपकरणांवरील कस्टम ड्युटी माफ केली आहे. देशभरात १ मे पासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे.

मुंबईत 12 रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची लवकरच उभारणी

या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. या आधी केंद्र सरकारने कोरोना लस आणि इतर वैद्यकीय उपकरणांवरील कस्टम ड्युटी माफ केली आहे. सध्या केंद्र सरकारकडून परदेशातून भारतात येणाऱ्या लसींवर १० टक्के सीमा शुल्क आणि १६.५ टक्के जीएसटी आणि सामाजिक कल्याण सेस लावला जातो. या कराच्या ओझ्यामुळे भारतात लसींचं उत्पादन करणाऱ्या सिरम आणि भारत बायोटेक या लसींची किंमत वाढते. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पुढील ३ महिन्यांच्या कालावधीत लसींची किंमत नियंत्रणात राहण्यासाठी मदत होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक महत्वाच्या राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्याची अनेक प्रकरण समोर येत आहेत. काही ठिकाणी रुग्णांना वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे प्राणही गमवावे लागले आहेत. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजनचे टँकर महत्वाच्या ठिकाणी पोहचवण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन संदर्भात कोणत्याही उपकरणावरील सीमा शुल्क हटवून ती थेट गरजू व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचा मार्ग केंद्र सरकारने मोकळा केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp