jhimma 2 : झिम्मा पुन्हा घालणार धुमाकूळ, हेमंत ढोमेने केली मोठी घोषणा
प्रेक्षकांना भावलेला आणि बॉक्स ऑफिसवर कमाई करणारा झिम्माचा सिक्वेल लवकरच भेटीला येणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी याची घोषणा केली आहे. त्यामुळे झिम्मा 2 मध्ये काय काय धमाल असेल, हे बघण्यासाठी चाहतेही आतुर आहेत. एक मजेशीर अनाऊन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करून हेमंत ढोमे याने झिम्मा 2 चित्रपटाची घोषणा केली. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था […]
ADVERTISEMENT

प्रेक्षकांना भावलेला आणि बॉक्स ऑफिसवर कमाई करणारा झिम्माचा सिक्वेल लवकरच भेटीला येणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी याची घोषणा केली आहे. त्यामुळे झिम्मा 2 मध्ये काय काय धमाल असेल, हे बघण्यासाठी चाहतेही आतुर आहेत.
एक मजेशीर अनाऊन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करून हेमंत ढोमे याने झिम्मा 2 चित्रपटाची घोषणा केली. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद एल. राय आणि क्षिती जोग या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते आहेत विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ.
झिम्मा 2 : टीझरमध्ये काय?
या व्हिडीओत निर्मला (निर्मिती सावंत) पुन्हा एकदा फिरायला जाण्यासाठी साहेबांकडे (अनंत जोग यांच्याकडे) परवानगी मागताना दिसत आहेत. यावेळी साहेबांनीही ट्रीपला येण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना नकार देत, पुन्हा एकदा ‘बाया बायाच’ ट्रीपला जायची तयारी करत असल्याचं निर्मला समजावते. साहेब मात्र निर्मलाला सूनबाईंना बरोबर घेऊन जा, असं सांगतात… आता सूनबाई कोण? यावेळी ही ट्रीप कुठे जाणार आणि यात केवळ त्याच मैत्रिणी असणार की, आणखी मैत्रिणींची भर पडणार? चित्रपट आल्यानंतरच कळेल.
झिम्मा 2 बद्दल निर्माते आनंद एल. राय म्हणाले, ‘पुन्हा एक मराठी सिनेमा करताना आम्हाला खूप आनंद होतोय. झिम्माला प्रेक्षकांची दाद मिळाली. तसेच २०२१ मधील बॅाक्स ॲाफिसवर जबरदस्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला. चित्रपटातून एक चांगला संदेश देण्यात आला ज्याने प्रेक्षक प्रभावित झाले आणि म्हणूनच आम्ही झिम्मा २ आणत आहोत.’
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, ‘झिम्मावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे प्लॅन्स केले. झिम्मा सर्वांनाच खूप जवळचा वाटला. आजही मी कुठे गेल्यावर मला अनेक जणी झिम्मा आवडल्याचे आवर्जून सांगतात. अनेकींनी झिम्मा २ लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन या, अशी मागणीही केली. त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी ‘झिम्मा २’चा निर्णय घेतला आणि आता लवकरच ‘झिम्मा २’ही सीमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे.’