आमदारांना मुंबईत घरं देण्याच्या निर्णयावर लोक संतापले; आता आव्हाडांनी केला खुलासा

मुंबई तक

राज्यातील ३०० आमदारांना मुंबई घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर जनतेमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावरून जनतेतून सरकारवर टीका होऊ लागली असून, यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३०० आमदारांना मुंबईत घरं देण्याच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यातील ३०० आमदारांना मुंबई घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर जनतेमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावरून जनतेतून सरकारवर टीका होऊ लागली असून, यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३०० आमदारांना मुंबईत घरं देण्याच्या निर्णयावरून नाराजीचा सूर उमटला आहे. अनेकांनी आमदारांच्या आर्थिक परिस्थितीचे हवाले देत सरकारवर या निर्णयावरून टीकेची झोड उठवली. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयाला मनसेचे आमदार वगळता कुणीही विरोध केल्याचं अद्याप दिसलेलं नाही.

“आमदारांना घरं देण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे सरकारनं करदात्यांच्या पैशावर घातलेला दरोडा आहे. ज्यांची शंभर कोटींच्या पुढे संपत्ती आहे. त्यांनाही मोफत घरं मिळणार ही राज्याच्या तिजोरीची लूट आहे”, असं मत मराठी रोजगार या ट्विटर हॅण्डलवरून मांडलं गेलं.

त्याचबरोबर गणेश बर्डे पाटील या नावाने असलेल्या यूजरने थेट आव्हाडांनाच सवाल केला. “७० लाख खर्च करण्याची गरज आहे का? का आमदारांना घरं नाही? हेच पैसे जर गोरगरिबांना किंवा शेतकरी वर्गाला दिले, तर त्यांना नक्कीच फायदा होईल.उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवेल तिकडे काही उपाय योजना करता येईल का ते बघा.पण असं कोणताच आमदार करणार नाही. त्यांना घर घेण्यात रस आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp