आर्थिक फसवणूक प्रकरणात किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी अटक केल्यानंतर, त्यावेळी पंच म्हणून किरण गोसावी हा राहिला होता.त्याच दरम्यान पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाच्या आर्थिक फसवणुकीच प्रकरण समोर आले. त्या पार्श्वभूमीवर किरण गोसावीला 28 तारखेला अटक केल्यावर, न्यायालयामध्ये हजर केले. त्यावेळी नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले असता त्यामध्ये वाढ करीत […]
ADVERTISEMENT

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी अटक केल्यानंतर, त्यावेळी पंच म्हणून किरण गोसावी हा राहिला होता.त्याच दरम्यान पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाच्या आर्थिक फसवणुकीच प्रकरण समोर आले. त्या पार्श्वभूमीवर किरण गोसावीला 28 तारखेला अटक केल्यावर, न्यायालयामध्ये हजर केले. त्यावेळी नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले असता त्यामध्ये वाढ करीत 8 नोव्हेंबर पर्यंत न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
किरण गोसावी पुणे पोलिसांना कसा गुंगारा देत होता?
अॅडव्होकेट राहुल कुलकर्णी यांनी फिर्यादी चिन्मय देशमुख यांच्यामार्फत तर बचाव पक्षाकडून अॅडव्होकेट सचिन कुंभार यांनी काम पाहिले.
युक्तिवाद झाल्यानंतर राहुल कुलकर्णी म्हणाले की, पुण्यात 2018 मध्ये चिन्मय देशमुख या तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी किरण गोसावी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याला अटक झाल्यावर अनेक जण पुढे तक्रारी घेऊन येत असून लातूर, पालघर, वानवडी,हडपसर, लष्कर, फरासखाना, अंधेरी आणि ठाणे या ठिकाणी एकूण 9 गुन्हे दाखल झाले आहेत. चिन्मयच्या वाक़िलांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. त्यामुळे अनेक गोष्टी पुढे येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे आणि पुणे परिसरातील तरुणांकडून नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपये या ठिकाणी केपी गोसावी याने उकळले होते. पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या एका तरुणाकडून गोसावीने मलेशियात नोकरी लावून देतो असं अमिष दाखवून 3 लाख रुपये उकळले होते.
चिन्मयने हे पैसे गोसावीला दिले, ज्यानंतर त्याला मलेशियात पाठवण्यातही आलं. परंतू मलेशियाला पोहचल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं चिन्मयला लक्षात आलं. चिन्मय यानंतर पुण्यात परत आला आणि त्याने किरण गोसावीकडे आपले पैसे परत मागितले, यावेळी गोसावीने चिन्मयला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चिन्मय देशमुखने पोलिसांत गोसावीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पुणे पोलीस गोसावीच्या शोधात होते, परंतू दरम्यानच्या काळात तो फरार झाला होता.