कोल्हापूर: तब्बल साडेसहा लाखाच्या नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक बाइक जळून खाक

मुंबई तक

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस अक्षय पार्क इथं विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रिकल दुचाकींना अचानक आग लागून त्या जळून खाक झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या आठही बाइक एका इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंग करण्यात आल्या होत्या. या इलेक्ट्रिक बाइकमधील एका बॅटरीने अचानक पेट घेतला. ज्यानंतर एका पाठोपाठ सुमारे 8 बाइक या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस अक्षय पार्क इथं विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रिकल दुचाकींना अचानक आग लागून त्या जळून खाक झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या आठही बाइक एका इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंग करण्यात आल्या होत्या. या इलेक्ट्रिक बाइकमधील एका बॅटरीने अचानक पेट घेतला. ज्यानंतर एका पाठोपाठ सुमारे 8 बाइक या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनी आग विजवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीचं स्वरुप भयंकर असल्याने ही आग विझवता आली नाही. त्यामुळे या आगीत तब्बल 8 वाहनांचं सुमारे अंदाजे साडेसहा लाखांचं नुकसान झालं आहे.

कोल्हापूरातील नागाळा पार्क परिसरातील अक्षय पार्क इथल्या प्राईम रोज या 6 मजली इमारतीत प्रदीप जाधव हे कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या मालकीचं शाहूपुरी तिसर्‍या गल्लीत गाड्यांचं शोरूम आहे. बॅटरीवरील वाहनांची एजन्सी असल्याने या वाहनांची विक्री ते करतात. 2 दिवसांपूर्वी सुमारे 12 वाहनांचा लॉट त्यांना मिळाला होता.

वाहनं लावण्यासाठी शोरूममध्ये जागा नसल्यानं त्यांनी प्रत्येकी 80 हजार रुपये किंमतीची ही वाहनं त्यांनी ते राहात असलेल्या प्राईम रोज अपार्टमेंटच्या तळमजल्यावर पार्क केल्या होत्या. या दुचाकींपैकी एका वाहनातील बॅटरीने अचानक पेट घेतला. एकापाठोपाठ एक अशी 10 वाहनं पार्क केली असल्याने बॅटरीचा स्फोट झाल्याने इतर वाहनांनीही पेट घेतला.

दरम्यान, अपार्टमेंटच्या तळमजल्यावर खेळत असलेल्या मुलांना आग लागल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ या आगीबाबत पालकांना माहिती दिली. अपार्टमेंटमधील आणि स्थानिक रहिवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.

टँकरमध्ये उकळत्या डांबराचा स्फोट होऊन भीषण आग, दोन जण ठार तिघांची प्रकृती गंभीर

यावेळी आग अधिकच भडकल्याने धुराचे लोट गगनाला भिडले होते. अखेर रहिवाशांनी मोठ्या प्रयत्नानंतर ही आग विझवली. मात्र, या आगीत 12 पैकी 8 वाहनांचं सुमारे साडेसहा लाखांच नुकसान झालं.

इलेक्ट्रिक वाहनं ही सुरक्षित समजली जातात. मात्र, याच वाहनांनाच आग लागल्याने आता याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp