लातूर: सरकारचं नेमकं बिनसलंय काय? प्रसूती रजेवरील महिला एसटी कर्मचाऱ्याला केलं निलंबित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुनील कांबळे, लातूर

राज्यातील एसटी कर्मचारी अद्यापही आंदोलनातून माघार घेत नसल्याने आता सरकारकडून आता कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून आंदोलक कर्मचाऱ्यांविरोधात गैरशिस्तपणाचा ठपका ठेवत निलबंनाची कारवाई सुरु केली आहे.

आत्तापर्यंत राज्यात जवळपास 9000 कर्मचाऱ्यांचं निलंबन देखील केलं आहे. मात्र लातूर तालुक्यातील मुरुड इथे राहणाऱ्या सारिका कोद्रे-लाड या लातूर डेपोमधील महिला वाहक ज्यांची नुकतीच प्रसूती झाली होती. त्यामुळे त्या अधिकृतरित्या प्रसूती रजेवर होत्या. पण असं असताना देखील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सारिका कोद्रे-लाड या गेल्या 16 वर्षांपासून एसटी महामंडळात सेवा बजावीत आहेत. दोन महिन्यापूर्वी त्यांनी रितसर अर्ज केला होता. ज्यानंतर त्यांना प्रसूती रजा देखील देण्यात आली होती. तरीदेखील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सारिका कोद्रे-लाड यांची 25 दिवसापूर्वी प्रसूती झाली आहे. मात्र, गैरशिस्तपणाचा ठपका ठेवत एसटी महामंडळाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. त्यामुळे स्वतः सारिका कोद्रे यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

प्रसूती रजा दिल्यानंतरही अशा पद्धतीचे निलंबनाचे आदेश ज्यांनी काढले आहेत त्यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी वाहक सारिका कोद्रे यांनी केली आहे. तसेच कोणत्या अधिकाऱ्यांने आणि कशा पद्धतीने माझ्यावरती कारवाई केली आहे ते महामंडळाने सांगावं आणि माझ्यावरती चुकीची कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरती त्वरीत कारवाई करावी. असंही त्या म्हणाल्या.

ADVERTISEMENT

एसटी कर्मचाऱ्यांची ठाम भूमिका

जो पर्यंत महामंडळाचे विलगीकरण राज्य शासनामध्ये होणार नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही केलेला संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

‘करो या मरो; या भूमिकेमध्ये सध्या तरी आंदोलनकर्ते पाहायला मिळतात. दुसरीकडे या परिस्थितीमुळे काही एसटी कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत. ज्यामुळे सध्या परिस्थिती ही अत्यंत बिकट बनली असून याबाबत सरकारने लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी आता केली जात आहे.

सरकारकडून विलिनीकरणाचा निर्णय नाही, पण..

परिवहन मंत्री अनिल परब यांनी तीम दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली होती की, विलिनीकरणाचा विषय समितीसमोर आहे. मात्र, सरकारकडून पगारवाढ करण्यात येत आहे. त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले होते.

‘ज्या कर्मचाऱ्यांना एक वर्ष ते 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

राजकीय खाज शमेल इतकेच, पण…; एसटी संपावरून शिवसेनेनं भाजपला सुनावलं

‘ज्याचं मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्यांचं वेतन आता 17 हजार 80 रुपये झालं आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 17 हजार होतं. त्यांना आता 24 हजार वेतन मिळणार आहे. त्यामुळे एकूण 41 टक्के पगारवाढ झाली आहे.’

‘ज्या कर्मचाऱ्यांचा पगार हा 16 हजार आहे त्यांचा पगार 23 हजार 40 होणार आहे. तर 20 वर्षाहून अधिक वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांना2 हजार 500 ने वाढ देण्यात येणार आहे. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजाराहून झालेला आहे.’

‘याशिवाय मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थूल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचं मूळ वेतन 39 हजार 500 होणार आहे. तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होणार असल्याचं अनिल परब म्हणाले आहेत.’ दरम्यान, आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ असल्याचंही परब यांचं म्हणणं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT