LIC IPO आलाय, पण त्यात गुंतवणूक कशी करायची?; पॉलिसीधारकांना किती सवलत?
‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’, असं म्हणत शहरांपासून गावखेड्यांपर्यंत पोहोचलेल्या एलआयसीचा आयपीओ आज लॉन्च झाला आहे. अनेक दिवसांपासून एलआयसी आयपीओची प्रतिक्षा होती. ९ मेपर्यंत तुम्हाला एलआयसीचा आयपीओ घेण्याची संधी आहे. LIC चा IPO आज (४ मे) लॉन्च झाला आहे. भारतात फार अशी कमी कुटुंब आहेत, ज्यांच्याकडे LIC ची पॉलिसी नसेल. ४० लाख […]
ADVERTISEMENT

‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’, असं म्हणत शहरांपासून गावखेड्यांपर्यंत पोहोचलेल्या एलआयसीचा आयपीओ आज लॉन्च झाला आहे. अनेक दिवसांपासून एलआयसी आयपीओची प्रतिक्षा होती. ९ मेपर्यंत तुम्हाला एलआयसीचा आयपीओ घेण्याची संधी आहे.
LIC चा IPO आज (४ मे) लॉन्च झाला आहे. भारतात फार अशी कमी कुटुंब आहेत, ज्यांच्याकडे LIC ची पॉलिसी नसेल. ४० लाख कोटी इतका पब्लिक मनी एलआयसीकडे आहे. ज्यांच्याकडे पॉलिसी आहे त्यांना LIC च्या IPO मध्ये सुवर्णसंधी आहे. कारण त्यांच्यासाठी खास सवलत दिली जाणार आहे. यासाठी त्याची प्रक्रिया समजून घेणं महत्त्वाचं आहे.
एलआयसी जगातील पाचवी कंपनी
१९५६ मध्ये भारत सरकारने विमा व्यवसायाचं राष्ट्रियीकरण केलं. त्याचवेळी देशातील सर्व आयुर्विमा कंपन्या ज्या साधारण २४५ च्या घरात होत्या, त्या सगळ्यांना एकत्र करुन एलआयसीची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार LIC चे सर्व शेअर्स सरकारकडे होते. आज जगाचा विचार केला तर LIC ही जगातली पाचवी आयुर्विमा कंपनी आहे. LIC मधला फक्त ३.५ टक्के ते ५ टक्के इतकाच वाटा विकण्याची विशेष परवानगी सरकारला SEBI कडून मिळालेली आहे. त्यानुसार केंद्र सरकार केवळ ३.५ टक्केच शेअर विकणार आहे. म्हणजेच २२ हजार कोटींचे शेअर्स विकणार आहे. यामधून २१ हजार कोटी रुपये केंद्राच्या तिजोरीत जमा होणं अपेक्षित आहे.