पुण्यातील 'लाच सम्राट' अधिकारी ACB च्या जाळ्यात, तब्बल 8 कोटी ठरले; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहात पकडलं

मुंबई तक

Pune Crime news : पुण्यातील 'लाच सम्राट' अधिकारी ACB च्या जाळ्यात, तब्बल 8 कोटी ठरले; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहात पकडलं

ADVERTISEMENT

Pune Crime news
Pune Crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील 'लाच सम्राट' अधिकारी ACB च्या जाळ्यात

point

तब्बल 8 कोटी ठरले; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहात पकडलं

Pune Crime news : सहकारी संस्थेकडून तब्बल आठ कोटींची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडत मोठी कारवाई केली आहे. लिक्विडेटर म्हणून काम पाहणारे विनोद देशमुख आणि त्यांना सहाय्य करणारे ऑडिटर भास्कर पोळ हे दोघेही तीस लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना जाळ्यात सापडले. या प्रकरणामुळे पुण्यातील सहकारी क्षेत्रातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

धनकवडी परिसरातील ‘एकता सहकारी संस्था’ या संस्थेत काही वर्षांपूर्वी आंतरिक मतभेद निर्माण झाले. सभासदांमध्ये तणाव वाढल्यानंतर संस्थेचा कारभार 2020 साली थेट सहकार विभागाकडे गेला. त्यानंतर 2024 मध्ये संस्थेच्या कामकाजासाठी विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली. संस्थेची पुण्यात मौल्यवान अशी मालमत्ता असल्याने तिच्या व्यवहारांबाबत अनेक निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र, या निर्णय प्रक्रियेत देशमुख यांनी सभासदांकडे अनधिकृत रकमेची मागणी सुरू केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : सावंतवाडी : शिकारीसाठी गेल्यानंतर समोर प्राणी आल्याचा भास, अन् चुकून सोबत आलेल्या मित्राच्या छातीवर गोळी झाडली

मिळालेल्या माहितीनुसार, संस्थेतील 32 सभासदांना शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तब्बल तीन कोटींची मागणी करण्यात आली होती. तसेच संस्थेच्या मालकीची जमीन विक्री प्रक्रियेला मंजुरी द्यायची असल्यास आणखी पाच कोटी रुपये घेण्याचा प्रयत्न देशमुख यांनी केला, अशी तक्रार एसीबीकडे करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मागणी आठ कोटींपर्यंत पोहोचत होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp