whatsapp चॅटवर प्रेमाच्या गप्पा, Video कॉलनंतर सुरू व्हायचं...

whatsapp वर मुलगी असल्याचं भासवून अनेक लोकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
love chat on whatsapp want to start after video call cheating money ghaziabad crime
love chat on whatsapp want to start after video call cheating money ghaziabad crime(प्रातिनिधिक फोटो)

गाझियाबाद: सोशल मीडियाच्या माध्यमातून Video कॉलिंग करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका व्यक्तीला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती देशातील विविध राज्यातील लोकांना आपलं शिकार बनवत होता. नूह मेवात येथील रहिवासी असलेल्या आरोपी झाकीर याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने सांगितले की, तो तरुणीच्या नावाने फेसबुकवर बनावट आयडी बनवत असे. फेसबुकवर लोकांशी मैत्री करून तो चॅटच्या माध्यमातून त्यांच्याकडून व्हॉट्सअॅप नंबर घेत असे.

आरोपी झाकीर बनावट आयडीवरून सिम घेत असे. यामध्ये त्याला रायपूरमध्ये राहणारा त्याच्या बहिणीचा नवरा मुफीक हा देखील मदत करत होता. याच आधारे तो लोकांशी अनोळखी लोकांशी चॅट करायचा. समोरची व्यक्ती पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकली आहे, असं जेव्हा त्याला वाटायचं तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ कॉलवर बोलण्यास प्रवृत्त करायचा. समोरच्या व्यक्तीला देखील असं वाटायचं की, तो एखाद्या मुलीशीच बोलत आहे. त्यामुळे ते देखील व्हिडिओ कॉलसाठी तयार व्हायचे.

व्हिडिओ कॉल सुरू करण्यापूर्वी, हे लोकं दुसऱ्या फोनमध्ये अश्लील व्हिडिओ प्ले करायचे आणि ज्या फोनवरून व्हिडिओ कॉल सुरु असायचा त्या फोनसमोर अश्लील क्लिप सुरु ठेवायचे.

व्हिडिओ कॉल सुरू होताच, समोरच्या व्यक्तीला एखादा अश्लील व्हिडिओ दिसायचा. याचवेळी ही टोळी स्क्रीन रेकॉर्डिंग आणि स्क्रीन शॉट घ्यायचे. हे लोक तीन ते चार वेळा असे व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करायचे. यानंतर दुसऱ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून ते गुन्हे शाखेचे डीसीपी, डेप्युटी एसपी, अधिकारी विक्रम राठोर किंवा अन्य कोणत्याही नावाने पोलिस असल्याची बतावणी करून, तुम्ही कोणत्याही मुलीसोबत ऑनलाइन गैरवर्तन केले आहे, अशी धमकी द्यायला सुरुवात करायचे.

याबाबत तरुणीने फिर्याद दिली आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होणार आहे, अशी धमकीही दिली समोरच्या व्यक्तीला द्यायचे. तसेच अटकेची देखील भीती दाखवायचे.

जर तुम्हाला तुमची इज्जत वाचवायची असेल तर लगेच यूट्यूब मॅनेजर गौरव मल्होत्रा, ज्याचा नंबर हे लोक स्वतः समोरच्या व्यक्तीला द्यायचे आणि नंतर त्याच्याशी बोला आणि त्याला व्हिडिओ हटवण्यास सांगा असे सांगायचे. यानंतर दिलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर तथाकथित यूट्यूब मॅनेजर हा व्हीडिओ डिलीट करण्यासाठी पैशाची मागणी करायचा.

दुसरीकडे अटक टाळण्यासाठी या टोळीतील लोक समोरच्या व्यक्तीकडे पैशांची मागणी करायचे. जी लोकं या धमक्यांना अधिक घाबरायचे ती लोकं पेटीएम, फोनपे, गुगल पे, एअरटेल पेमेंट बँक यावर संबंधित आरोपींना पैसे देऊन टाकायचे. ऑनलाइन पैसे मिळविण्यासाठी देखील बनावट सिम आणि बनावट पत्त्याच्या आधारे बँक खाते उघडत होते. एखाद्या व्यक्तीला अधिक घाबरवून आरोपी हे त्याच्याकडून अधिकाधिक पैसे उकळायचे.

love chat on whatsapp want to start after video call cheating money ghaziabad crime
ज्येष्ठ नागरिकांसोबत सेक्सटॉर्शन, Video कॉलनंतर ब्लॅकमेलिंग; नेमकं प्रकरण काय?

समोरची व्यक्ती आपला समाजात अनादर होईल, आपली बदनामी होईल याची भीती बाळगून कोणाकडेही तक्रारही करत नव्हता. हे लोकं अनेकदा गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणून स्वतःहून रोख रक्कम गोळा करण्यासाठी देखील जात असे. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ते नेहमी बनावट सिम मोबाईल आणि बनावट पत्त्यावर उघडलेले बँक खाते वापरत. गेल्या 2-3 वर्षांपासून या टोळीने देशातील विविध राज्यात शेकडो लोकांना या प्रकाराचा बळी बनवले आहे. या टोळीतील उर्वरित साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in